वाडीत नाभिक एकता मंचचे मूक आंदोलन:राज्य शासनविरोधात संताप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१२ जून २०२०

वाडीत नाभिक एकता मंचचे मूक आंदोलन:राज्य शासनविरोधात संताप

 आ. समीर मेघे यांना दिले निवेदन
नागपूर / अरूण कराळे(खबरबात)  
तालुक्यातील वाडी नाभिक एकता मंचच्या वतीने राज्यातील सलून व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तामिळनाडू व दिल्लीच्या धर्तीवर सलून व्यवसाय सुरू करण्याची करण्याची परवानगी देण्यात  यावी ,अन्यथा आम्हाला १० हजार रुपये दरमहा मदत देण्यात यावी अशी मागणी करत गुरुवार ११ जुन रोजी   दत्तवाडीतील रामकृष्ण सभागृह पासून सत्यसाई सोसायटी,गजानन सोसायटी ते  दत्तवाडी चौकापर्यंत  मूक आंदोलन केले .

केंद्र सरकारद्वारे लवकरात लवकर सलून दुकाने सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार समीर मेघे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली . यावेळी वाडी नपचे माजी उपाध्यक्ष नरेश चरडे ,वाडी मंडळ उपाध्यक्ष कमल कनोजे,कैलाश मंथापूरवार उपस्थित होते. आंदोलना दरम्यान प्रत्येक सलुन दुकानदारांनी आपल्या तोंडावर काळे मास्क व दंडाला काळ्या फीती लावून राज्यशासन विरोधात संताप व्यक्त करून प्रत्येकांनी  हातात सूचना फलक घेऊन मुक प्रदर्शन घडविले  .कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय २३ मार्च पासून बंद आहेत.
त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करून आपले व्यवसाय आज पर्यंत बंद ठेवले आहे.असे प्रतिपादन विलास वाटकर यांनी केले.  नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास मागील दोन महिन्या पासून जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारणी द्वारे निवेदन देऊन नाभिक सलून व्यवसायिकास मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही.
नाभिक एकता मंचच्या वतीने वारंवार पत्र देवून शासनास स्मरण करुन देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. त्या मध्ये शासनाने आमच्या मागणीचा विचार करून नाभिक सलून व्यवसायिकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी व आर्थिक मदत सुद्धा आज पर्यंत केली नाहीं. असे मत कार्याध्यक्ष वसंतराव घडीनकर यांनी व्यक्त केले. 
आंदोलनात अध्यक्ष राजेश मानकर, कार्याध्यक्ष वसंत घडीनकर, विलास वाटकर, रवींद्र खैरकर, मनोज राजूरकर, सतीश नंदनकर, विलास अतकरे, वासुदेव कुक्कडकर ,सुनील बोरकर, विजय वलोकर राजेंद्र चौधरी,कुनाल मोरस्कर ,रमेश वाटकर, अर्जुन वालोकर , राजेश चांदेकर , राजेश मानकर ,मनोज राजूरकर, मनोहरराव मांढवकर, शंकर वलोकर, अजूर्न वलोकर, सुनिल बोरकर, विनोद चौधरी,दिवाकर निंबूळकर, अमोल तळखंडे, हरीश पारधी, मनोज राजूरकर, राजेश चांदेकर,सतीश नांदनकर, विलास अतकरे,राहूल पोपटे ,मनोहर उरकुडे ,लक्ष्मण शर्मा,महेश राजुरकर , अमोल तळखंडे आदीसह नाभिक एकता मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते .