दिव्यांग असलेल्या वडिलांना व आईला मारहाण करून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

दिव्यांग असलेल्या वडिलांना व आईला मारहाण करून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न

 - दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी केली अटक 
- इंदिरा नगर परिसरातील धक्कादायक घटना


दिव्यांग असलेल्या वडिलांना व आईला मारहाण करून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपुरातील इंदिरा नगर परिसरात आरोपी व घराशेजारी राहणार्या परिवारासोबत भांडण झाले. 
त्यानंतर आरोपींनी पीडितांच्या घरी जाऊन आंधळे असलेल्या मुलीच्या वडिलांना तसेच आईला बेदम मारहाण केली. त्यांनतर घरात शिरून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडितांनि थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.