सोनेगाव (निपाणी),दवलामेटी परिसरात पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ जून २०२०

सोनेगाव (निपाणी),दवलामेटी परिसरात पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण

नागपूर/ अरूण कराळे (खबरबात) 
एमआयडीसी मधील एका खाजगी कंपनीमधील काम करणारी दवलामेटी निवासी रमाबाई आंबेडकर नगरमधील महीला व सोनेगाव (निपाणी) मधील श्रमीक नगर मधील दोघांचा रिपोर्ट कोरोना पॉजिटिव्ह आल्यामुळे वाडी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 दवलामेटी वार्ड क्रमांक चार मधील रमाबाई आंबेडकर नगर मधील महिला कोरोना पॉजिटिव्ह निघाल्यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कंपनीचे पर्यवेक्षक मनोज पटले यांना दवलामेटी ग्रामपंचायत मध्ये बोलावून कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागीतली .

दवलामेटी येथील २५ कर्मचारी कामावर असल्याची यादी दिली. या सर्व कर्मचाऱ्यांच्या घरी आशा वर्कर उषा चारभे ,नीलू मेश्राम , इंदिरा बलवीर ,मनोज गणवीर ,सुरेंद्र शेंडे ,उमेश वाघमारे ,मारीया यांनी भेट दिली . रामजी आंबेडकर नगर व पुरुषोत्तम नगर सील केला आहे. यावेळी डीसीपी विवेक मसाल, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पाठक,तहसीलदार मोहन टिकले, खंडविकास अधिकारी किरण कोवे , वैद्यकिय अधिकारीडॉ. हेमके ,डॉ. सत्यवान वैद्य, व्याहड आरोग्य केंद्राचे डॉ. सुषमा धुर्वे,ग्राम विकास अधिकारी विष्णु पोटभरे ,उपसरपंच गजानन रामेकर ,माजी सरपंच ,संजय कपनीचोर ,माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य नितिन अडसड ,ग्रा. पं. सदस्य प्रशांत केवटे प्रामुख्याने उपस्थित होते .