चंद्रपुरात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ जून २०२०

चंद्रपुरात आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

खबरबात/ चंद्रपूर

चंद्रपूर येथे मुंबईवरून १ जून रोजी आलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने कळविले आहे.
३१ मे रोजी मुंबईवरून निघालेला हा व्यक्ती १ जून रोजी चंद्रपूरला पोहचला. जुनोना रोड शिवाजी नगर चंद्रपूर येथील या व्यक्तीने दुपारी लक्षणे आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क केला. या ठिकाणी कोविड आयसोलेशन वार्डमध्ये त्यांना दाखल करण्यात आले.१ जूनला सायंकाळी स्वॅब घेण्यात आले.
२ जूनला रात्री उशिरा त्यांच्या अहवाल पॉझिटीव्ह आला. सदर व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर काही वेळ घरी गेला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील आई - वडिल , पत्नी, मुलगी यांचाही स्वॅब घेण्यात येणार आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २४ झाले आहेत.आतापर्यत २० रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २४ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ४ आहे.