चंद्रपूर:शहरातील लोहारा जंगलात झाडाला लटकून दिसला मृतदेह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

चंद्रपूर:शहरातील लोहारा जंगलात झाडाला लटकून दिसला मृतदेहचंद्रपूर: 
शहरालगत असलेल्या लोहारा गावातील जंगल परिसरात एका झाडाला इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.गुरुदास शेडमाके असे मृत इसमाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक लोहारा गावातील जंगल परिसरात दुपारच्या सुमारास गेले असता त्यांना एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावातील नागरिकांना देण्यात आली.त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.