जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी स्थानिक निधीतून दिले अत्यावश्यक साहित्य - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०२०

जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी स्थानिक निधीतून दिले अत्यावश्यक साहित्य
प्राथमिक आरोग्य केंद्रांना दिले वैद्यकीय साहित्यसंजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 7 मे 2020
नवेगावबांध:-गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष तथा गोठणगाव क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांनी 8 लक्ष रुपयाच्या आपल्या स्थानिक निधीतुन अजुनी मोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव ला अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचे स्थानिक संरपंच तथा ग्रामवासीयांच्या उपस्थीतीत दिनांक ६/५/२०२० रोजी वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे यांच्यासह अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले, गोठणगाव ग्रामपंचायतचे सरपंच जिजाबाई चांदेवार, ग्रामसेवक फटिंग, शकुंतलाबाई वालदे, माजी सरपंच भागरथाबाई राणे हे यावेळी उपस्थित होते. पीपीइ किट, सॅनि टायझर पंप मशीन,N-95 मास्क, हॅन्ड वाश सोल्युशन, हॅन्ड ग्लोज हायपो क्लोराईड सोल्युशन, हॅन्ड वॉश स्टेशन, सॅनिटायझर इन्फ्रा रेड थर्मामीटर, पल्स ऑक्सिमिटर या साहित्याचे वाटप करण्यात आले. गोठनगांव जिल्हा परिषद क्षेत्रातील बोंडगांवसुरबन येथील सरपंच शहारे बाई, उपसरपंच दीनदयाळ डोंगरवार, परसराम हटवार, रामनगर येथे सरपंच, ग्रामसेवक दरवडे ,प्रतापगड च्या सरपंच अहिल्याबाई वालदे, तारक राय, गोपीनाथ दरवडे, भोजराम लोगडे, रेशीम लोथे उपस्थित होते. चान्ना/बाक्टी येथेही साहित्य वाटप करण्यात आले.