आईसोबतच्या भांडणानंतर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

आईसोबतच्या भांडणानंतर गळफास घेऊन युवकाची आत्महत्याचंद्रपूर (प्रतिनिधी) : लॉक डाऊनच्या काळात घरात राहणाऱ्या लाखो लोकांची मानसिक स्थिती खराब झाली असून घरगुती तंटे तेवढेच वाढले आहे. त्यातच ज्या घरातील व्यक्ती दारूचा शौकीन असेल व त्याला दारू मिळत नसेल आणि जर एखाद्या वेळी दारू मिळालीच तर मग त्याचे संतुलन बिघडते अशीच एक दुःखद घटना चंद्रपूर तूकूम परिसरातील वाघोबा चौकातील चाहारे परिवारात घडली असून त्या परिवारातील दिनेश चहारे या ३६ वर्षीय युवकाने आई सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणामुळे संतापून जावून आज मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान चक्क परिवारासमोरच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहीती दुर्गापूर पोलिस स्टेशन मधे देण्यात येवून आजच अंतिम संस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे वार्डातिल लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात लहान दोन मुले असल्याची माहीती आहे. बातमी लिहिस्तोवर कुणावर ही गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.