मातोश्री व डेबु सावली वृध्दाश्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने किराणा व धान्य किटची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२०

मातोश्री व डेबु सावली वृध्दाश्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने किराणा व धान्य किटची मदत

चंद्रपुर(खबरबात):
कोरोनाच्या संकटावर मात मिळविण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व सामान्यांसह वृध्दाश्रमांनाही बसत आहे. हि बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नतंर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मातोश्री व डेबु सावली वृध्दाश्रम येथे किराणा व धान्य किटची मदत करण्यात आली. विशेष म्हणजे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने संचारबंदीच्या पहिल्या दिवशी पासूनच गरजुंना मदत केली जात आहे. 

कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगा समोर संकट उभे केले आहे. भारतात या संकटाशी लढण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमूळे हातावर पोट असणा-यांसमोर जगण्यासाठी मोठे आवाहण उभे राहले आहे. अशात चंद्रपूरात गरजुंना मदत म्हणून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मदतकार्य सुरु आहे. दरम्याण संचाबंदीमूळे संकटात अडकेल्यांनकडेच दानशुरांचे लक्ष केंद्रित आहे. त्यामूळे वृध्दाश्रमे संकटात सापडण्याची भिती वर्तवली जात होती. ही बाब लक्षात घेता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचने नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मातोश्री व डेबु सावली या वृध्दाश्रमांना किराणा व धान्य किटची मदत करण्यात आली. पोटच्या गोळयांनी नाकारलेले तसेच आधार नसलेल्या वयो वृध्दांना या आश्रमांमध्ये आधार दिल्या जात आहे. त्यामुळे हे आश्रम सक्षम झाले पाहिजेत शहरातील दानशुरांनीही या आश्रमांना शक्य ती मदत केली पाहिजे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने या अगोदरही या आश्रमांना मदत पोहचविण्यात आली आहे. मात्र आता संकटसमयी त्यांच्या वतीने करण्यात आलेल्या मदतीला अधिक महत्व आहे. संचार बंदीच्या काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने समाजीतल प्रत्येक गरजु पर्यंत मदत पोहचविल्या जात असून त्यांची ही सेवा अविरत सुरु आहे.