संकटकाळी देशभरात सेवा देत असलेल्या चंद्रपूरातील कोव्हीड योध्दांच्या माता पितांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२०

संकटकाळी देशभरात सेवा देत असलेल्या चंद्रपूरातील कोव्हीड योध्दांच्या माता पितांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार


चंद्रपूर(खबरबात):
कोरोना विरोधात लढत असतांना डॉक्टर कोविड योद्धा म्हणून समोर आले आहे. चंद्रपुरातील ही अनेक डॉक्टर देशभरात कर्तव्य बजावत असून कोविड १९ विरोधातील लढ्यात सहभागी होऊन देशसेवा करत आहे. याच चंद्रपूरचा पुत्र असलेल्या कोविड योद्धांचा चंद्रपूरकरांना अभिमान असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर या कोव्हीड योद्धांचा माता पितांचा यंग चांदा ब्रिगेटच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या डॉ. अभिलाषा गावतुरे, वंदना हातगावकर, पंकज गुप्ता, विश्वजीत शहा, प्रतीक शिवणकर, महेश काहिरकर, राशीद हुसैन, रुपेश पांडे शुभांगी डोंगरवार, विमल काटकर यांची उपस्थिती होती.

जगासह भारतातही कोरोना विषाणूने कहर माजविला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या जिवघेण्या विषाणूपासून देशाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी स्वत:च्या घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केल्या जात आहे. 

मात्र अशा संघर्षाच्या परिस्थितीत पोलिस, सफाई कर्मचारी व विषेशत:ह आरोग्य विभागातील डॉक्टर नागरिकांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. यातील अनेक डॉक्टरांनी या कालावधीत आपल्या घरच्यांच्या दुर राहूनही देशसेवेच्या कार्यात स्वत:ला झोकुन दिले आहे. यात चंद्रपूरातील काही युवा डॉक्टरांचाही समावेश आहे. चंद्रपूरातील डॉ. मुरलीधर रडके, यांची सुपुत्री डॉ. दिक्षा रडके हि पालघर, मुंबई येथे, शरद रामावत यांचे सुपुत्र डॉ. सुमेर शरद रामावत हे सुरत, येथील शासकीय रुग्णालय कोरोना सेंटर येथे, डॉ. खान यांची सुपुत्री डॉ. शहरीश खान हि भोपाल येथे, डॉक्टर डॉ. नरेंद्र कोलते, यांचा सुपुत्र डॉ. शौनक कोलते सायन मुंबई येथील लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मधील कोव्हीड केअर सेंटर मध्ये, बलरामजी डोडानी यांची सुपुत्री डॉ. बरखा डोडानी इंडेक्स मेडिकल कॉलेज, इंदोर येथील कोविड केअर सेंटर मध्ये तर डॉ. अंकित मेश्राम हे मुंबई येथील मनपाच्या एम. डब्ल्यू. देसाई हॉस्पिटल येथे कोरोणा बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अथक परिश्रम घेऊन अहोरात्र लढा देत आहे आई वडिलांपासून दूर राहून चंद्रपूरचे हे भूमीपूत्र देशसेवा करत चंद्रपूरचे नाव लौकीक करत आहे. याची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर सदर डॉक्टरांच्या माता पितांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सदर डॉक्टरांचे चंद्रपूर येथील घर गाठत या कोव्हीड योध्दांच्या माता पितांना शाल, श्रीफळ, पूष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत सत्कार केला.