धन्वंतरीनगरात पिण्याच्या पाण्याची समस्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मे २०२०

धन्वंतरीनगरात पिण्याच्या पाण्याची समस्यायुवक काँग्रेसचे राहुल अभंग यांनी दिला आंदोलनाचा इशारा

नागपूर/ प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 28 येथील धन्वंतरी नगर परिसरात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या तातङीने न सोङविल्यास युवक काँग्रेसचे राहुल अभंग यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. 
दरवर्षी उन्हाळा आला की,  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच जलसाठ्यांची पातळी अत्यंत धोकादायक अवस्थेत असते. वाढलेला उन्हाळा व त्यातच निर्माण झालेल्या जलसंकटाने नागरिक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही येथील ओसीडब्ल्यूचे अधिकारी समस्या समजून घेत नाहीत.  कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यासाठी  लक्ष देत नाही. नागरिकांना पाणीपुरवठा जर झाला नाही तर युवक काँग्रेसचे राहुल अभंग यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. हार्दिक खोलगडे, गोलू भेंडे, सौरभ काळमेघ, नितेश तिजारे, श्रीकांत नवघरे, नरेंद्र घाडगे, विवेक येवले, रवींद्र ठाकरे, पार्थ खेडकर, राजू केचे, श्री. लांबाडे, येवले, नवघरे,  दिगंबर माणूसमारे, पंकज कुंडे यांनीही या मागणीसाठी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिलाय. कोरोना व्हायरससारख्या महाभयंकर बिमारीत जर हे आंदोलन करावे लागले आणि या आंदोलनादरम्यान   जर आमच्या जीवाला कमी-जास्त झालं तर याला जबाबदार प्रशासन राहील, असेही राहुल अभंग यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.