वरोरा पोलिसांची धडक कारवाई; 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२०

वरोरा पोलिसांची धडक कारवाई; 2 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्तवरोरा/शिरीष उगे:
 स्थानिक पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून दिनांक 08 मे 2020 रोजी शुक्रवारला दुपारी 12वाजता आरोपी शंकर रमेश शिवरकर (वय 34) नागरी तालुका वरोरा याने गौळ  शेत शिवार येथील त्याचे शेतात गावठी दारू बनविण्याकरिता मोहफुल सडवा  साठवून ठेवला होता.

सदर इसमाचे शेतात जाऊन कार्रवाई केली असता अकरा प्लास्टिक ड्रम मध्ये एकूण तेराशे लिटर मोहफुल सडवा किंमत अंदाजे रुपये  260, 000/-चा मुद्देमाल मिळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून सदरचा  माल जागीच नष्ट केला. सपोनि राजकिरण मडावी यांचे फिर्यादीवरून आरोपी शंकर रमेश शिवरकर यांचेवर भादवि 65 (बी )(फ ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 सदर कार्रवाई माननीय सतीश देशमुख( भा पो से )प्रभारी अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजकिरण मडावी., सपोनि सतीश सोनटक्के, नापोका  दीपक दुधे, पोका अनुप नाईक, मोहन निषाद, सुरज मेश्राम, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी किनाके, वैशाली काळे यांनी केली.