शहरामधून आलेल्याना सौजन्याची वागणूक द्या:सामाजिक कार्यकर्ते रोशन तेलंगे यांचे नागरिकांना आवाहन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१४ मे २०२०

शहरामधून आलेल्याना सौजन्याची वागणूक द्या:सामाजिक कार्यकर्ते रोशन तेलंगे यांचे नागरिकांना आवाहन


वर्धा(खबरबात):
ग्रामीण भागातून नौकरी,व्यवसायानिमित मोठ्या शहरामधे किंवा अन्य राज्यामधे गेलेले नागरिक आता स्वगृही येत आहेत. बहुतांशी लोक रितसर परवानगी घेऊन गावी येत आहेत.आपले राज्य सुसंस्कृत आहे. गावकऱ्यांनी गावात आलेल्या आपल्या बांधवांशी सौजन्याने व मानुसकीच्या नात्याने वागावे असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते रोशन तेलंगे यांनी केले आहे.

ते पुढे म्हणाले की गावात येणारे मानसेही आपलीच आहेत त्यांना प्रशासन होम क्वारंटाईन   किंवा संस्थात्मक क्वारंटाईन  करित आहेत. त्यांच्या कुटुंबाने प्रशासनाच्या सूचनाचे पालन करावे. सद्ध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वाची भित्ति योग्य आहे. पण मुंबई,पुणे किवा इतर राज्यात असणारे आपले बांधव हे त्या ठिकाणी अडकून पडले आहेत.त्यांना आपल्या गावी आपल्या घरी परतायचे आहे.अश्यावेळी ते गावात आल्यानंतर त्यांची काळजी घ्यावी.सोशल डिस्टन्सिंगचे पालण करीत त्यांना योग्य ते सहकार्य करावे.

( काही वर्षापूर्वी दुष्काळी परिस्तिथित आपले कुटुंब जगविण्यासाठी गाव सोडलेले आपलेच बांधव कबाडकष्ट व मेहनत करुण स्वताच्या पायावर सक्षमपणे उभे रहलेले आहेत.अडचणीच्या काळात त्यानी सदैव आपापल्या गावांना मदतीचा हात दिलेला आहे.आता त्यांना आपल्या आधाराची गरज आहे आपन सर्वजन त्यांना या प्रसंगात आधार देऊ असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते रोशन तेलंगे यानी केले आहे.)