माहुली मित्र मंडळाच्या वतीने वाहतूक पोलीसांना होमियोपॅथिक औषधाचे वितरण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

माहुली मित्र मंडळाच्या वतीने वाहतूक पोलीसांना होमियोपॅथिक औषधाचे वितरण

नागपूर / अरूण कराळे (खबरबात ) 
कोरोना विषाणूच्या महामारी पासुन पोलिसांचा बचाव व्हावा या करिता माहुली मित्र मंडळाने वाहतूक विभाग पोलिस ठाण्यात जाऊन पोलीसांना होमियोपॅथिक औषधाचे वितरित करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जाधव, सहायक पोलीस निरिक्षक विनोद गिरी, एएसआय तायडे, पांडे, मिश्रा,राहुल,हेडकॉन्स्टेबल बाळू चव्हाण, मनोज नागमोते, रवींद्र गजभिये,अनिल बलके,शरदचंद्र मून ,अरुण भोयर, पोलीस शिपाई अन्सारी इतर कर्मचारी उपस्थित होते.कोरोना विषाणूच्या महामारी संदर्भात पोलीसांवर नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे .लाॅकडाऊन आणी संचारबंदी काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलिस बांधव अहोरात्र आपल्या कर्तव्यावर तैनात आहेत.

या गंभीर परिस्थितीत पोलिसांचेही आरोग्य चांगले राहावे या उद्देशाने माहुली मित्र मंडळाच्या वतीने होमियो पॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले . होमिओपॅथिक गोळ्यांचे सेवन केल्याने हिम्युनिटी पावर शरीरात वाढणार . दररोज तीन ते चार गोळ्या घ्यावे लागेल असे तीन दिवस घेऊन नंतर महिन्यातून एकदाच घ्यावे लागेल . या मोहीमेत डॉ .अरविंद बुटले, डॉ. राजेश काळे, डॉ. सुदामे ,डॉ. सुरेंद्र खरे ,डॉ.सुभाष खरे इत्यादी उपस्थित होते. माहुली मित्र मंडळा तर्फे आतापर्यंत हजारो बॉटल्स वितरित करुन आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे .