घाबरू नका,धैर्य ठेवा ,उपासमारीची वेळ येऊ देणार नाही;आमदार समीर मेघे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२०

घाबरू नका,धैर्य ठेवा ,उपासमारीची वेळ येऊ देणार नाही;आमदार समीर मेघे

दवलामेटी येथे दररोज १५०० लोकांना अन्नदान 
वाडी:
सध्या राज्यात लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्य रोजमजुरीचे काम करणारा गरीब,शेतमजूर,कामगार वर्ग यांची दैन्यावस्था झाली असून या वर्गातील परिवारावर कोणत्याही परिस्थितीत उपाशी राहण्याची वेळ येणार नाही,कोरोना बाधितांची आपल्या जिल्ह्यात वाढती संख्या पाहता शासनाने लॉकडाऊन कालावधी वाढविल्यास घाबरू नका,धैर्य ठेवा,घरीच सुरक्षित रहा मी व माझा मित्र परिवार आपणा सोबत आहे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार समीर मेघे यांनी अन्नदान करतांना दिली.

चिननिर्मीत कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही,यातून सुखरूप बाहेर निघण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला.अशावेळी रोजमजुरीचे काम करणाऱ्यावर उपासमारीची वेळ येणार नाही याची दक्षता घेत हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांच्या मार्गदर्शनात संचारबंदी लागू झाल्यापासून भाजप कार्यकर्ते विशाल कुंभरे,मयुर मानकर,सुनील आदोलकर,अतुल नागपूरे,कार्तिक पारधी,
महेश गायकवाड,आयुष खोब्रागडे,विशाल नेवासे,रुपेश चव्हाण,राजण राम,सचिन फरकसे,नाना गुर्वे,योगेश कपनिचोर,अमोल मानकर,मोहन आंबटकर,वैभव बावणेतुषार ढोमणे,सुरज कराडे,रोहीत शेंडे,रानू ठाकूर,दिपक प्रजापती,शैलेश तुरकर,किष्णा महतो,महेंद्र नेवारे,गजानन बच्छेरे,कल्पना आत्राम,वैशाली लोखंडे प्रिया गेडाम,दिपीका येरमे,पिंकी धुर्वै,निलिमा नारनवरे,सिता सुनारीया वंदना इवनाते,दुर्गा उईके,चंदा फुलसंगे पवन गजभिये आदी मित्रपरिवार अहोरात्र परिश्रम घेत दररोज दोन वेळेचे पोटभर जेवण देण्याचे कार्य दवलामेटी परिसरातील निवारा लॉंन मध्ये नियमित शारीरिक अंतर,सॅनिटायझर व मास्कचा वापर करून व कोरोना आजारापासून घ्यावयाची दक्षता याबाबत सुचना,मार्गदर्शन करीत जनजागृती करीत असून या स्त्युत्य उपक्रमास देवराव कडू, संजय कपनिचोर ,विशाल कुंभरे,प्रमोद केवटे,अब्बू कुरेशी,अंकुश वानखेडे,प्रेमनाथ कुंभरे,रमेश गोमासे,रेखा कोडापे,प्रकाश डवरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.