वाडी न.प.च्या सफाई कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

वाडी न.प.च्या सफाई कामगारांचा भेटवस्तू देऊन सत्कार

भाजपा व सार्वजनिक शिवमंदीर ट्रस्टचा उपक्रम नागपूर  
अरूण कराळे:
सफाई कामगार हे नेहमी लोकांच्या तिरस्काराचा विषय असतात .शहरात सर्वत्र कोरोना विषाणूचा भय असतानाही स्वतःचा जीव धोक्यात घालुन वाडी शहरात काम करणारा वाडी नगर परिषदचा सफाई कामगार समाजापासून वंचित राहिलेला घटक आहे .मात्र आजच्या स्थितीत सफाई कामगारांचे करीत असलेले त्यांचे कार्य समाजाला बरेच काही सांगून जात आहे असे मार्गदर्शन नगरसेवक केशव बांदरे यांनी केले .
भारतीय जनता पक्ष वाडी व सार्वजनिक शिव मंदीर ट्रस्ट ,मंगलधाम सोसायटी यांच्या संयुक्त सहकार्याने कामगार दिनानिमीत्य शिवमंदीरांच्या प्रांगणात वाडी न.प.च्या सफाई महीला व पुरुष कामगारांना साडी , टी शर्ट ,मिठाई व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सफाई कामगारांवर पुष्प वर्षाव करून टाळ्या वाजवून आभार मानले.

आजच्या कोरोना विषाणू प्रादूर्भावाच्या बिकट परिस्थितीत सफाई कामातून समाजासाठी काम करणाऱ्या या सैनिकांना मानाचा मुजरा असल्याचे मनोगत नगरसेवक नरेश चरडे यांनी व्यक्त केले .आज सर्व जग कोरोनाशी लढत आहे कोरोनाला हरवायचे असेल तर स्वच्छता साफसफाई आणि सोशल डिस्टन्सिंग हा उपाय महत्त्वाचा मानला गेला आहेत. असे मनोगत सार्वजनीक शिवमंदीर ट्रस्टचे अध्यक्ष कमल कनोजे यांनी व्यक्त केले .यावेळी माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे ,नगरसेवक केशव बांदरे , कमल कनोजे, आनंदबाबू कदम ,राजेंद्र तिवारी ,मनोज रागीट ,चंद्रशेखर देशभ्रतार, जितेंद्र रहागडाले ,बापू लिमकर, विक्रम तिजारे,मनीष गाडे ,देवराव खाटीक, समीर मसने,सुरेश विलोणकर ,नितीन अन्नपूर्णे , राकेश शिवणकर ,नितीन सावरकर ,गजेंद्र देवघरे ,राजेंद्र बिसेन ,अनिल घागरे ,राकेश चौधरी ,सतिश नांदनकर ,धिरज पिल्ले आदी उपस्थित होते.