शेतकरी ते व्यापारी अडतमुक्त बाजाराचा शुभारंभ:कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणाचा उपक्रम - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

शेतकरी ते व्यापारी अडतमुक्त बाजाराचा शुभारंभ:कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणाचा उपक्रम


नागपूर : अरूण कराळे:
कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा येथे शेतकरी ते थेट व्यापारी या संकल्पनेवर अडतमुक्त बाजाराचे शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य दिनेश रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते करण्यात आले. 

बाजाराच्या शुभारंभा प्रसंगी पहिल्याच दिवशी २२०पोते तुरीची आवक झाली असून शेतमालाला ५३०० रुपये इतका भाव मिळाला. 
सदर बाजार अडतमुक्त असून शेतकऱ्याच्या मालाला जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा समितीचा माणस असून शेतमालाच्या दारातून कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे काटा, हमाली, अडतं वसुल करण्यात आले नाही. 
यावेळी पं. स. सभापती बबनराव अव्हाळे, साहाय्यक निबंधक चैतन्य नासरे, सचिव किरण काकडे, राँकापा युवक तालुकाध्यक्ष आशिष पुंड, व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतक-यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणा तर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार कऱण्यात आला. 

सादर बाजार अडत मुक्त असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान सभापती बबनराव अव्हाळे व सचिव किरण काकडे यांनी केले. तर सादर बाजार दर सोमवार व गुरुवार रोजी सुरु राहील.