वाडीत ट्रकच्या धडकेने तरुण जागीच ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ मे २०२०

वाडीत ट्रकच्या धडकेने तरुण जागीच ठार

धक्कादायक


नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
तालुक्यातील वाडी येथील राष्ट्रीय महामार्ग स्थित पेट्रोल पंप वरून पेट्रोल भरून निघालेल्या तरूणाचा भरधाव ट्रकने धडक दिल्याने जागीच ठार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे .
प्राप्त माहितीनुसार मृतक रोशन श्याम सहारे वय ३८ रा . सिरसपेठ नागपूर येथील निवासी दुपारी २. ४५ वाजताच्या दरम्यान मोटार सायकल क्रमांक एम. एच. ४९ एम १८४६ मध्ये नागपूर-अमरावती महामार्ग स्थित एचपी पेट्रोल पंप येथे पेट्रोल भरून दत्तवाडी कडे जात असतांना नागपूर वरून अमरावती कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक सी जी ०४ जी ४४३१ यांनी जोरदार धडक दिल्याने मृतक रोशनचा जागीच अंत झाला.ट्रकचालक घटनास्थळावरून ट्रकसह फरार झाला.मृतकाला स्थानिक नागरीकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती केले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.मृतकाची त्याच्या वाहन परवान्यावरून ओळख पटली असून वाडी पोलिसांनी अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.