सजग नागरिकांनी दिले झाडांना जीवदान - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मे २०२०

सजग नागरिकांनी दिले झाडांना जीवदान


 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर मधील रस्त्यावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेली शोभेची झाडे पाण्याअभावी  सुकु लागल्याने  ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चाने टँकरने स्वतः पाणी घालून या झाडांना  जीवदान दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त करतानाच या सजग  नागरिकांनी दाखवलेल्या सामाजिक  बांधिलकीचे नागरीकांनी कौतुक केले आहे. जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून पंचलिंग चौकापर्यंत  रस्त्याच्या मध्ये असलेल्या  दुभाजकामध्ये  मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्याने  शोभेची झाडे लावली होती. प्रत्येक वर्षी शिवजयंतीला नव्याने झाडे लावण्यात येतात
 देखभालीअभावी यातील बरीचशी झाडे चुकून जातात. पुन्हा प्रत्येक शिवजयंतीला नव्याने झाडे लावण्यात येतात हा सिलसिला गेले अनेक वर्षे सुरू आहे .19 फेब्रुवारी नंतर या झाडांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणी घातले नाही किँवा कोणतीही देखभाल केली नाही .जुन्नर बस स्थानक परिसरात असलेल्या हॉटेल व्यावसायिक  वापरलेले पाणी टाकून या झाडांना जगविण्याचा प्रयत्न करतात. सध्या लॉकडाउनमुळे  हॉटेल व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने झाडांना पाण्याची कोणतीही व्यवस्था झालेली नाही.सुकुन  चाललेल्या या  झाडांची अवस्था पाहुन  सेवानिवृत्त शिक्षक  प्रदीप वाईकर यांनी  स्वतःच्या घरचा ट्रॅक्टर व टँकर आणून त्यांचे सहकारी माजी उपनगराध्यक्ष  राजेंद्र बुट्टे पाटील, नितीन ससाणे ,भगवान चौधरी ,प्राध्यापक विलास कडलक,रामदास फल्ले यांच्या मदतीने झाडांना पाणी घातले. तसेच परदेशपुरा येथील महिलादेखील जमेल तेवढे घरातील पाणी टाकून झाडे जगविण्याचा प्रयत्न करत आहेत .झाडांच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. नगरपालिकेची अग्निशमन दलाची दलाचे वाहन आहे वाहनातून शहरात अनेक ठिकाणी खाजगी व धार्मिक कार्यक्रमांना पाणीपुरवठा केला जातो परंतु या झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी नगरपालिका देखील उचलण्यास तयार नाही . जबाबदारी कोण घेणार सार्वजनिक बांधकाम घेणार का नगरपालिका घेणार  पेचप्रसंगात दोन्ही घरचा पाहुणा उपाशी याप्रमाणे ही झाडे सुकून चालली होती.


रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांनी जमेलकिल्ले शिवनेरी कडे जाणारा रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी असलेली लॉन  देखील जुन्नर नगरपालिकेने १९  फेब्रुवारी रोजी लावली होती. परंतु येथे असलेल्या  नळजोडाला  पाणी येत असल्याने लॉन पूर्णपणे सुकून गेली आहे.(२) सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारयांचा संपर्क होऊ शकत नाही .हे आधिकारी स्वतःच्या विभागाच्या  काम  तर  करत नाहीत  परंतु करोना  आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काही जबाबदारी दिल्या होत्या परंतु आपत्ती व्यवस्थापन सारख्या जबाबदारीच्या कामात देखील  अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने त्यांना  तहसिलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजाविल्या  आहेत .