लक्ष्मी स्वरूपा अनसूया माता जन्मोत्सव (देऊळ बंद) सोहळा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

लक्ष्मी स्वरूपा अनसूया माता जन्मोत्सव (देऊळ बंद) सोहळा
नागपूर/प्रतिनिधी
लक्ष्मी स्वरूपा अनसूया मातेचा ९३ वा जन्मोत्सव व मंदिराचा २० वा वर्धापन दिन आज दिनांक ५ मे २०२० रोजी अनसूया मंदिर(देऊळ बंद) शांती विद्या भवन प्रांगण दिगडोह हिंगणा रोड येथे फक्त मंदिराचे पुजारी कर्मचारी व संग्राम व डॉ नेहा पनकुले ह्यांच्या हस्ते सकाळी ७:०० वाजता मातेचे मंगल स्नान करण्यात आले , दुपारी १२:३० वाजता आरती व माउली ला ५६ भोग, नैवेद्य अर्पण करण्यात आला.
सायंकाळी ७:३० वाजता महाआरती adv व सुदर्शन शि वानी पनकुले ह्यांचा हस्ते  महाप्रसाद व नेवैद्य अर्पण करण्यात आला ह्या प्रसंगी पुजारी चंद्रभूषण मिश्रा, दिलीप पनकुले डॉ सुषमा, डॉ नेहा , डॉ शुभांगी, संग्राम व अड सुदर्शन पनकूले,  दीपक रडके, लक्की कोटगुळे योगेश व रेखा चौधरी,अनिता फ्रान्सिस, गितेश चरडे, प्रवीण नाकडे, विवेक लाडे उषा पुस्नाके कर्मचारी उपस्थित होते भक्तांनी आपल्या घरी राहून मातेची तन-मन- धनाने सेवा रुजू केली. नियमित योगदान करणाऱ्या भक्तांना घरपोच महाप्रसाद वितरण करण्यात येत आहेअसे दिलीप पनकुले परिवार व भक्त गणां तर्फे जाहीर करण्यात येत आहे.