घुटकाला वार्डातील नशेडी दुकानदाराचे राशन दुकान सील - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

घुटकाला वार्डातील नशेडी दुकानदाराचे राशन दुकान सीलग्राहकांच्या तक्रारी वरून नगराध्यक्षांनी केली वरिष्ठांकडे तक्रार

भद्रावती/शिरीष उगे
शहरातील घुटकाला वार्डातील सरकारी स्वस्त धान्य दुकान क्रमांक 85 चा धान्य दुकानदार दारूच्या नशेत ग्राहकांना नाहक त्रास देत असल्यच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी तहसीलदार व ठाणेदार यांच्याकडे तक्रार केली असता वरिष्ठांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षक विशाल खांडगे दुकानाचा पंचनामा करून दिनांक 9 मे रोजी दुपारी एक वाजता राशन दुकान सील कारवाई केली. पोलिसांनी दुकानदारास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल पुरवठा निरीक्षक यांचेकडे सादर केला.


घुटकाला वार्डातील अंक फॅन्सी माणिका देवी बचत गटाला शासनाने चालविण्याकरिता दिले असून सदर दुकान किशोर चिकटे नामक दुकानदार चालवितो. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सरकारी स्वस्त धान्य दुकान चालू ठेवण्याची वेळ सकाळी सात ते परी दोन वाजेपर्यंत ठरविण्यात आली आहे मात्र सदर दुकानदार हा दिलेल्या वेळेनुसार दुकान उघडता दररोज सकाळी 11 वाजता दुकान उघडतो. त्यामुळे ग्राहकांना सकाळपासून दुकानासमोर ताटकळत उभे राहावे लागते. त्यातल्या त्यात सदर दुकानदार दारू पिऊन नशेमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन धान्य दिरंगाई करीत असल्याची ग्राहकांनी अनिल धानोरकर यांचेकडे केली. त्यांनी केलेल्या तक्रारीवरून धानोरकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसीलदार महेश शितोळे व ठाणेदार पवार यांच्याकडे केली. या तक्रारीवरून तहसीलदार यांच्या माफिक आदेशान्वये अन्न पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक विशाल कानगे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता दुकान चालक किशोर चिकटे हा दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दुकानातील असलेल्या धान्याचा व दुकानाचा पंचनामा करून घुटकाला वॉर्डातील सरकारी स्वस्त धान्य दुकान क्रमांक 85 सील करण्याची कारवाई केली. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्के त्यांनी नशेडी दुकान चालकास ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिऊन असल्याचे निष्पन्न झाले तसा अहवाल पोलिसांनी पुरवठा निरीक्षक यांचेकडे सादर केला. दुकान सील केल्यामुळे ग्राहकांमध्ये एकच खळबळ माजली.
--------------------------------------------

  "घुटकाला वार्ड मधील दुकान क्र.85 जरी सील करण्यात आले असले तरी या दुकानाचा अन्य दुसऱ्या भार दुकानदाराकडे सोपविण्यात येईल दुकान सोमवार दिनांक 11 मे पासून सुरळीत सुरू होईल . याचा लाभ शिधा  पत्रिका  धारकांनी घ्यावा"
    पुरवठा निरीक्षक- विशाल कानगे
--------------------------------------------

    कोरोना विषाणू संक्रमण काळात शहरातील कोणत्याही प्रभागातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांशी अभद्र वागणूक देत असतील तर त्यांची गय केल्या जाणार नाही. मिळालेल्या तक्रारीवरून त्या-त्या दुकानदारांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात येईल. राशन दुकानदारांनी ग्राहकांशी चांगली वागणूक द्यावी.
     नगराध्यक्ष :अनिल धानोरकर
        नगर परिषद भद्रावती
--------------------------------------------