कोरोना महामारीच्या संकटात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुराचा मदतीत खारीचा वाटा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

कोरोना महामारीच्या संकटात औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुराचा मदतीत खारीचा वाटा

 
राजुरा/प्रतिनिधी:
सध्या देशासह महाराष्ट्रातही कोरोना महामारीमुळे आपत्ती ओढावली असून संपुर्ण देश पुर्णपने लॉकडॉऊन आहेत. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही बंद आहेत. या कालावधीत प्रशिक्षनार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मा.सहसंचालक श्री देवतळे साहेब यांचे निर्देशानुसार व मा. प्राचार्य श्री. वैभव बोनगीरवार यांचे मार्गदर्शनात औ. प्र. संस्थेतील सर्व शिल्पनीदेशक आपआपल्या प्रशिक्षणार्थांना घरबसल्या ऑनलाईन प्रशिक्षण देत आहेत 

व याला प्रशिक्षणार्थ्यांचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान कर्तन व शिवण आणि फॅशन टेक्नॉलॉजी या व्यवसायातील प्रशिक्षणार्थांनी मा. प्राचार्य श्री. वैभव बोनगीरवार यांचे सूचनेनुसार व आपल्या निदेशिक कु.दीपा मेश्राम आणि कु.सोनाली कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे शिक्षण त्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात संस्थेत घेतले त्याचा उपयोग त्यांनी या काळात लोकांना मदत म्हणून आपआपल्या घरी मास्कची निर्मिती करून सदर मास्क गावातील नागरिकांसाठी मोफत वितरीत करण्यात आले.

आज पर्यंत जवळपास 500 मास्क राजुरा तालुक्यातील विविध गावात वितरित करण्यात आलेले असून आवश्यकता पडल्यास अजून मास्क निर्मिती करण्यात येईल असे मा. प्राचार्य श्री. वैभव बोनगीरवार यांनी सांगितले. यासर्व कार्यासाठी बऱ्याच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव व नागरीकांनतर्फे प्रशिक्षणार्थांचे व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कौतुक केले जात आहे