पत्रकार सतिश भालेराववर प्राणघातक हल्ला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ मे २०२०

पत्रकार सतिश भालेराववर प्राणघातक हल्ला
आरोपी स्वप्निल शाहाकर याला पोलिसांनी पत्रकार संरक्षण कायदा व अॅट्रासिटी अॅक्ट अंतर्गत केली अटक


नागपूर/ अरूण कराळे (खबरबात)
जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या वानाडोंगरी येथील पत्रकार सतीश भालेराव यांच्यावर नगराध्यक्ष पुत्र स्वप्निल सतीश शाहाकर याने साथीदारच्या मदतीने प्राणघातक हल्ला केला. त्यात पत्रकार सतिश भालेराव थोडक्यात बचावला.


हल्ला करणाऱ्या सर्वांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य गृहमंत्री,पोलिस आयुक्त नागपूर,डिसीपी झोन 1,सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे व एमआयडीसी पीआय हेमंत खराबे यांना देण्यात आले. हिंगणा तालुक्यातील पत्रकार सतीश भालेराव यांचेवर रविवार 17 मे रोजी रात्री 9.30 वाजता ते घरी जात असतांना स्वप्नील शहाकार यांनी आपल्या सहा ते सात मित्रासह भालेराव यांचेवर हल्ला करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.अशी तक्रार सतीश भालेराव यांनी हिंगणा एमआयडीसी पोलिस स्टेशनला केली.या तक्रारीची त्वरीत दखल घेवुन सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी आरोपी स्वप्नील सतीश शहाकार याला अटक केली. परंतु इतर सहकारी अजुनही फरार आहेत. त्यांना सुद्धा त्वरीत अटक करण्यासाठी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने संयुक्त निवेदन ठाणेदार हेमंतकुमार खराबे व सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांना देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघपाल गडलिंग, सचिव विजय खवसे, महाराष्ट्र उपाध्यक्ष गजानन ढाकुलकर, नागपूर जिल्हाध्यक्ष भिमराव लोणारे, हिंगणा तालुका अध्यक्ष रोशन कापसे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ सहसचिव विनायक इंगळे उपस्थित होते. स्वप्नील शहाकार सोबत असणाऱ्या सर्व आरोपींचा त्वरीत शोध घेऊन त्यांचेवर सुद्धा त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी पत्रकार संघाच्या पत्रकारांना दिले.
आरोपी स्वप्निल सतीश शाहकार व सहकारी यांचे वर अँट्रासिटी अॅक्ट व महाराष्ट्र प्रसार माध्यम पर हिंसक कृत्य करने तसेच 294,323,506,34 भादवी कलम 2,5 नुसार एमआईडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.