सलूनमध्ये फेशियल मसाज करताना पोलिस जवान सापडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ मे २०२०

सलूनमध्ये फेशियल मसाज करताना पोलिस जवान सापडले
जुन्नरमध्ये सलूनमध्ये फेशियल मसाज करताना राज्य राखीव दलाच्या जवानांचे स्ट्रिंग ऑपरेशन


नाभिक संघटनेकडून कारवाईची मागणी


जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहरातील धान्यबाजार येथे नगर पालिकेच्या व्यापारी गाळ्यात शटर बंद करून राज्य राखीव दलाचे दोन जवान फेशियल मसाज करण्यात येत असल्याचा प्रकार जुन्नर तालुका नाभिक विकास संघटनेचे उपाध्यक्ष सचिन नेताजी कालेकर यांनी स्ट्रिंग ऑपरेशन करून उघडकीस आणला. पोलिसांकडूनच साथरोगप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची तक्रार जुन्नर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष सतीष डाके यांनी पोलिसांकडे केली होती.


याप्रकरणी सकाळी साडेदहा वाजता धान्य बाजारपेठेतील सुपरस्टार नावाच्या सलूनमध्ये बाहेरून शटर लावून सलून चालक पोलीसांचे फेशियल मसाज करत असल्याची माहिती नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याना मिळाली होती.सचिन कालेकर यांनी शटर उघडून या प्रकाराचे चित्रफीत काढली. या संदर्भात सलून व्यवसायिक एजाज शरीफ शेख रा. जुन्नर याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य राखीव दलाच्या त्या दोन जवानांची तातडीने बदली करण्यात आल्याची माहीती जुन्नरचे पोलीस निरीक्षक युवराज मोहीते यांनी दिली.

  • लॅाक डाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या दोन जवानांची बारामती येथे बदली करण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.


  • लॉकडाउनच्या काळात ग्राहकांच्या घरी जाऊन व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजाच्या व्यवसायीकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होत असेल कायद्याचे पालन करणाऱ्या पोलीसांवर का नको असा सवाल कालेकर यांनी उपस्थित केला.