वडेट्टीवारांविरोधात नरेश पुगलियांनी केली पक्षश्रेष्ठींकङे तक्रार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ मे २०२०

वडेट्टीवारांविरोधात नरेश पुगलियांनी केली पक्षश्रेष्ठींकङे तक्रार


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे तक्रार
पालकमंत्रांवर अवलंबून न राहता सरकारने मदत करण्याची माजी खासदार श्री नरेश पुगलिया यांची मागणी
चंद्रपूर/
राज्य आपत्ती व्यवस्थापन कडून चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनावरील उपयोजनासाठी फक्त अडीच कोटींची निधी मिळाला असतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार डीपीसीडी आणि खनिज निधीतून ३८ कोटी रुपयांची नियोजन करण्यात आल्याचा फसवा दावा करीत आहे. एवढी मोठी तरतूद उपलब्ध केली असती तर जिल्हा प्रशासनाला विभागीय आयुताकडे ४ कोटी निधी साठी विनवणी करण्याची आवश्यकता का होती. असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार श्री नरेश पुगलिया यांनी वडेट्टीवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. पुगलिया यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे वडेट्टीवारांच्या केलेल्या तक्रारीत पालकमंत्रांवर अवलंबून न राहता कोरोनावरील उपयोजनासाठी सरकरने निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी केली आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अख्या महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. देशात सर्वंधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. एप्रिल महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा शोधूनही एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र मे महिन्याच्या सुरवातीपासून गेल्या पंधरा दिवसात कोरोनाचे दोन रुग्ण सापडले असल्याने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. चंद्रपूर शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्यात आले आहे. मात्र या कॉलेजमध्ये कोरोनावरील उपचारासाठी पुरेशी व्यवस्था अद्याप करण्यात आली नाही.

 त्यामुळे कोरोनाचा पहिला रुग्णाला उपचारासाठी नागपूर ला हलविण्यात आले. कोरोनावरील उपयोजनासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापना कडून प्रत्येक जिल्ह्याला निधी देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याला आतापर्यंत फक्त अडीच कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या अल्पशा निधीत फार काही उपयोजना करणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी विभागीय आयुक्तांकडे आणखी ४ कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे.यासंबंधीचे वृत्त 'पुण्यनगरी' ने प्रकाशित केल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. आणि आता सारवासारव सुरू करण्यात आली आहे.

 पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कोरोनावरील उपाययोजनांसाठी राज्यात सर्वधिक निधी चंद्रपूर जिल्ह्याला उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. डीपीडिसी आणि खनिज विकास निधीतून सुमारे २४ कोटी रुपये दिल्याचा त्यांचा दावा आहे. डीपीडिसी आणि खनिज विकास निधी हा हक्काचा आहे. या निधीला हात न लावता राज्य सरकारकडून दिल्या जात असलेल्या आपत्ती व्यवस्थापणा कडून मिळालेल्या अत्यंत अल्प निधीवर पांघरून घालण्यासाठी वडेट्टीवारानी सुरू केलेली सारवासारव जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणारी असल्याचे गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार श्री नरेश पुगलिया यांनी केला आहे.

पहिला लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अनेक दानशूर संस्था,उद्योग आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य चे किट्स व तयार केलेले भोजन गरजूंना उपलब्ध करून दिले. तसेच मुख्यमंत्री सह्ययता निधी आणि जिल्हाधिकारी सह्ययता निधीत अनेकांनी भरीव आर्थिक मदत केली. यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे नेमके योगदान काय. असा प्रश्न श्री नरेश पुगलिया यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्रायनी दहा दिवसापूर्वी नागरिकांना अन्नधान्य व किरानाचे २ लाख किट्स वाटण्यात येतील अशी घोषणा केली होती आणि आता एक दिवसाआधी याची आवश्यकता नाही असे जाहीर केले. मुळात काँग्रेसचा कोणताही सच्चा कार्यकर्ता किंवा नेता जनतेची दिशाभूल करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल. त्यामुळे सरकारने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर अवलंबून न राहता कोरोनावरील उपयोजनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.अशी मागणी नरेश पुगलिया यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पाठविलेल्या तक्रारीतून केली आहे.

 मदत व पुनवर्सन खाते पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचाकडे असताना राज्य आपत्ती व्यवस्थापन कडून जिल्ह्याला फक्त अडीच कोटी निधी मिळणे हे निश्चितच अभिमानास्पद नाही. येणाऱ्या काळात कोरोनासोबतच जगावे लागणार आहे. त्यामुळे हातात असलेल्या हक्काचा पैसा आतच खर्च करून नंतर पदर पसरणे हे शहाण्या राजकारण्याचे लक्षण नाही. राज्य सरकार कडून निधी खेचून आणण्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे काहीही योगदान दिसत नाही, असा आरोप माजी खासदार श्री नरेश पुगलिया यांनी केला आहे.