शिवसेना ग्रामीणचे मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 51 हजाराची मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

शिवसेना ग्रामीणचे मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाख 51 हजाराची मदत

नागपूर / अरुण कराळे ( खबरबात) 
कोविड १९ विषाणू संसर्गाने देशभर हातपाय पसरविले असतांना या आजाराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे.त्यामुळे नागरीकांच्या उपचारात अधीकाधीक सुविधा व्हावी या हेतुने मुख्यमंत्री सहायता निधीला अनेक दानदात्याचा हाथभार लागत आहे.
नागपूर ग्रामीणचे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधीका-यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आवाहन करुन एक लाख एक्कावन हजार रूपयाची राशी जमा केली. शिवसेना पदाधीका-यांच्या उपस्थितीत या राशीचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज सुपूर्द करण्यात आला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर , हिंगणा विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे,उपजिल्हाप्रमुख अशोक झिंगरे ,हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे ,तुषार डेरकर , नागपूर तालुका प्रमुख संजय अनासाने,जगदिश कनेर ,रवि जोडांगडे ,वाडी शहर प्रमुख प्रा .मधु माणके पाटिल , हिंगणा तालुका प्रमुख नंदु कनेर , नागपूर तालुका उपप्रमुख रुपेश झाडे,नागपूर तालुका उपप्रमुख अमोल कुरडकर ,विष्णू कोल्हे ,सुनील किटे ,विजय नाटके ,दिनेश इंगोले , नरेश मसराम ,प्रशांत ईखार , रुपराव उमक उपस्थित होते.