नेहमी वाद घालणाऱ्या पतीला पत्नीनेच संपविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मे २०२०

नेहमी वाद घालणाऱ्या पतीला पत्नीनेच संपविले

▪️🔳 आत्महत्या केल्याचे बनावट नाट्य अखेर उघडकीस

▪🔳 अखेर पत्नीला केली अटक

भद्रावती/शिरीष उगे
शहरातील किल्लावार्ड येथे राहणाऱ्या युवकाने गुरुवारला रात्रो बारा दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही हत्या की आत्महत्या याबाबत रहस्य असून पोलिसांनी मर्ग दाखल केला होता.
येथील गणेश उर्फ अतुल प्रभाकर वाटेकर वय 32 वर्ष राहणार भोजवार्ड असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून तो आपल्या आईवडिलांच्या शेजारी पत्नीसोबत राहात होता. घटनेच्या दिवशी पती-पत्नीमध्ये भांडण झाले होते त्यात गणेश ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती शेजाऱ्यांना गणेश च्या पत्नीने दिल्ली शेजारी लोक बघण्यासाठी गेले असता गणेश चा मृतदेह बेडवर होता तर छताला निवड दोरी बांधलेली दिसली होती या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्याकरिता नेण्यात आले यादरम्यान मृतकाच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कोणतेही निशाण आढळून आले नसून शवविच्छेदनाचा पुढील वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच या घटनेचा उलगडा निघेल परंतु हा मृत्यू संशयित असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किनाके यांनी सांगितले.
मात्र या इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बतावणी पत्नीने केल्यानंतर आत्महत्याही संशयित असल्याने पोलिसांनी सखोल तपास केल्यावर आपणच पतीची हत्या केल्याचे पत्नीने कबूल केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गटनेतआरोपीला अटक करण्यात आली आहे.
यातील प्रणाली गणेश वाटेकर वय २५ वर्ष राहणार किल्ला वार्ड असे आरोपी पत्नीचे नाव असून यातील गणेश उर्फ अतुल प्रभाकर वाटेकर असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी या दोघांचा विवाह झाला व त्यांना पंधरा महिन्याची मुलगी सुद्धा आहे. विवाहानंतर पती कमी शिकला व पत्नी जास्त शिकली यावरून तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत नेहमी वाद घालायचा. या दोन वर्षात ती कित्येकदा माहेरी सुद्धा गेली होती. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी गणेश च्या आई-वडिलांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले. तो त्याच परिसरात किरायाने राहत होता परंतु तिथे सुद्धा त्यांच्यात वाद व्हायचा दि. २१ रोजी गुरुवार ला रात्री बारा दरम्यान  प्रणाली ने आपल्या पती ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली या  घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मर्ग दाखल केला.  त्यानंतर  मयत गणेश चा लहान भाऊ हेमंत वाटेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की  माझ्या भावाचा घातपात झाला आहे.  याआधारे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा तसेच वैद्यकीय प्रथम अहवाल या आधारे प्रणालीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरूवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनीच आत्महत्या केल्याची कबुली दिली. परंतू पोलीसी खाक्या दाखवताच आपणच नवर्‍याचे दोन्ही हात बांधून गड्यावर दुपट्टा ठेवून त्याच्या नाका-तोंडावर उशी ठेवून त्याचा श्वास रोखून ठार केल्याची कबुली दिली .आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुनील सिंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहे.