महावितरणच्या विश्रामगृहाचे नाव आता "ऊर्जा अतिथी गृह " - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ मे २०२०

महावितरणच्या विश्रामगृहाचे नाव आता "ऊर्जा अतिथी गृह "


नागपूर(खबरबात):
महावितरणच्या सदर, बिजलीनगर परिसरात असलेल्या विश्रामगृहाचे नामकरण " ऊर्जा अतिथी गृह " या नावाने करण्यात आले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांनी विश्रामगृहाचे नामकरण करण्या संदर्भात सूचना संबंधीतांना केली होती. ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांनी केलेल्या सुचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे. " ऊर्जा अतिथी गृह " या नावाचा फलक परिसरात लावण्यात आला आहे.