महाराष्ट्र दिनी मनसे नागपूरने मेडिकल इस्पितळाला दिल्या १०१ पीपीई किट्स - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

महाराष्ट्र दिनी मनसे नागपूरने मेडिकल इस्पितळाला दिल्या १०१ पीपीई किट्स



नागपूर - आज १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर तर्फे कोरोना बाधित व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र कार्यरत वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स व चमू यांना सुरक्षिततेसाठी आवश्यक पीपीई किट्स नागपूर शासकीय मेडिकल इस्पितळाच्या कार्यालयात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना मनसे राज्य सरचिटणीस श्री. हेमंत गडकरी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. विविध भागात जेवणाच्या साहित्याचे वाटप असो वा आरोग्यासाठी काळजी घेणाऱ्या वैद्यकीय चमूच्या सुरक्षेसाठी असणारी पीपीई किट्स, असो हे देणे आमचे सामाजिक कर्तव्य असून आज जरी 100 चांगल्या दर्जाच्या किट्स देत असलो तरी एवढ्यावर न थांबता पुढेही आमच्या परीने आवश्यक गोष्टीची पूर्तता करण्यासाठी तत्पर राहू असे मनोगत राज्य सरचिटणीस श्री हेमंत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले, साध्य परिस्थितीत आम्हाला आवश्यक असलेल्या बाबीची पूर्तता केल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व मेडिकल अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी मनसेच्या कामाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी हेमंत गडकरी यांचे सोबत शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे,उप शहर अध्यक्ष प्रशांत निकम, विकास खोब्रागडे, रजनीकांत जिचकार,सचिव शाम पूनियानी, घनश्याम निखाडे, ,विभाग अध्यक्ष चंदू लाडे,उमेश उत्तखेडे, उमेश बोरकर,पिंटू बिसेन, शशांक गिरडे,महेश माने, मनोज गुप्ता, मनविसेचे शहर अध्यक्ष आदित्य दुरुगकर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे, वाहतूक सेनेचे शहर संघटक मंगेश शिंदे, अॅड.रणजित सारडे, अॅड. तेजस केणे,राहुल अलोने,दत्ता साकुलकर, निखिल झाडे,नितीन बंगाले, विशाल इंगळे, धीरज गजभिये,पवन साहू,दीपक उजेनकर, निशांत चव्हाण,अनिकेत दहिकर,समीर अरबट,अनिल भावे,यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी प्रो.डॉ. गौर, डॉ. कांचन वानखेडे, डॉ. मनीष ठाकरे, डॉ. मुकुल देशपांडे, यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर यांना मनसे तर्फे तुळशीचे रोपटे देऊन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.