पाॅझिटीव्ह रुग्णाची पत्नी आणि मुलीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

पाॅझिटीव्ह रुग्णाची पत्नी आणि मुलीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह
चंद्रपूर/(ख़बरबात)
गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला . चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले. चंद्रपूरातील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाच्या पत्नी आणि मुलीचा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुलाच्या रिपोर्टची प्रतीक्षा असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

चंद्रपूरमध्ये केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या 46 लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. संशयित 10 स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कंटेनमेंट झोनमध्ये पुढील 14 दिवस सर्वांना येणे-जाणे बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नव्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

www.khabarbat.in