लोकप्रिय दूरदर्शन वृत्तनिवेदिका,अभिनेत्री मालविका मराठे यांचं आज ,७ मे २०२० रोजी दुपारी १.३०च्या सुमारास दु:खद निधन झाले.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या माजी वृत्तनिवेदिका, आणि आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या माजी उद्घोषक मालविका मराठे यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या मेंदूच्या कर्करोगानं आजारी होत्या. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला आकाशवाणीच्या उद्घोषक म्हणून काम करत असतानाच, त्यांनी अनेक नाटकांमधेही भूमिका केल्या होत्या. सुमारे १० वर्षे दूरदर्शनच्या वृत्तविभागात काम केलं, दूरदर्शनवरच्याच हॅलो सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचं त्यांनी सलग १२ वर्ष सूत्रसंचलनही केलं. अलिकडेच नव्या संचात आलेल्या मोरुची मावशी या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती. याशिवाय अनेक मालिकांमधेही त्यांनी काम केलं होतं. अनेक रंगमंचीय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि निवेदिकेची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.