अखेर वीज केंद्राच्या रुग्णालयात ओपीडी सुरू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

अखेर वीज केंद्राच्या रुग्णालयात ओपीडी सुरूएका महिन्यानंतर मुख्य अभियंत्यांने केले परिपत्रक रद्द

खापरखेडा-प्रतिनिधी
स्थानिक वीज केंद्र कर्मचाऱ्याना व त्यांच्या कुटुंबियांना वीज केंद्राच्या रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमर्जन्सी असेल तरच रुग्णालयात या असे परिपत्रका द्वारे आदेश जारी करण्यात आले होते शिवाय आजार कळविण्यासाठी व्हॉटशाप नंबर जाहीर करण्यात आले होते रुग्णालयात येण्यास मज्जाव करीत असल्याने कामगार वर्गात तीव्र असंतोष पसरला होता यावर कामगार संघटनेने आक्षेप नोंदविला होता अखेर एका महिन्यानंतर मुख्य अभियंत्यांनी पूर्वीचे परिपत्रक रद्द करून ओपीडी सुरू करण्यात आली आहे.
खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या हजारो वीज कामगार व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी साठी असलेल्या रुग्णालयात कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढण्याचा हवाला देत रुग्णालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता शिवाय आजार असल्यास व्हॉटशापवर रोग्याचे नाव, काय त्रास आहे ते सांगितल्यावर त्यानुसार औषध फार्मसीच्या काउंटर वरून घेऊन जाण्याबाबत कळविण्यात आले होते शिवाय इमरजन्सी असेल तरच रुग्णालयात या असे परिपत्रक दिनांक २८.०३.२०२०  ला प्रसिद्ध करण्यात आले होते केंद्र व राज्य सरकार कोणत्याही नागरिकाला ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्याचा त्रास असल्यास त्वरित रुग्णालयात जाण्याच्या सूचना आहेत मात्र इमर्जन्सी असेल तरच रुग्णालयात या असे आदेश प्रसिद्ध करून रुग्णालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता कामगार संघटनांनी आक्षेप नोंदविल्यानंतर तातडीची बैठक बोलविण्यात आली संघटनांच्या  मागण्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली अखेर जुने परिपत्रक रद्द करून दिनांक ०६.०५.२०२० नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर परिपत्रकात व्हॉटशाप सुविधा सुरू करण्यात आल्याचे नमूद करून दोन मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे व्हॉटशाप वर वीज केंद्र कर्मचाऱ्यांचे कार्ड नंबर, रोग्याचे नाव त्रास काय आहे ते कळविण्याचे नमूद करण्यात आले असून औषधी घेण्यासाठी फार्मसीच्या काउंटर वर येण्याचे नमूद करण्यात आले मात्र सदर परिपत्रकातून इमर्जन्सी असेल तरच रुग्णालयात येण्याच्या सूचना वगळण्यात आल्या हे विशेष!
नागपूर व ईतर ठिकानावरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना वसाहतीत राहण्याच्या सूचना
नागपूर जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्णाची संख्या सारखी वाढत आहे त्यामुळे नागपूरसह ईतर ठिकाणावरून वीज केंद्रात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वीज केंद्राच्या वसाहतीत राहण्याचे आदेश दिनांक 2 मेला परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत मात्र त्यातील काही कर्मचारी अजूनही नागपूर वरून येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र वीज केंद्रात बाहेर गावावरून येणारे कर्मचारी आदेशाचे पालन करतांना दिसून  येत आहे