काळीमाती हनुमान मंदिर परिसरात विकास कामाचे भूमिपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

काळीमाती हनुमान मंदिर परिसरात विकास कामाचे भूमिपूजन

संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 2 मे 2020
नवेगावबांध:-आज आज सकाळी 10 वाजे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जागृत देवस्थान हनुमान मंदिर काळी माती येथे तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत पेवर ब्लॉक लावणे व व सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद क्षेत्र माहूरकुडा चे सदस्य गिरीश पालीवाल यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने नवेगाव जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर करणे व ग्रामपंचायत सुकळी चे सरपंच चंदेल उपस्थित होते. सोशल डिस्टन्स चे नियम पाळून सदर भूमिपूजन करण्यात आले .हनुमान मंदिर काळीमाती देवस्थानाला तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत 20 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्याबाबत परिसरातील जनतेने मान्यवरांचे आभार मानले आहे.