कितनी बार तूटा, लेकीन अपनो के लिये जीता हूं - जितेंद्र आव्हाङ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मे २०२०

कितनी बार तूटा, लेकीन अपनो के लिये जीता हूं - जितेंद्र आव्हाङ

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाङ यांनी आज भावना व्यक्त केल्या.

एका ट्विट मध्ये त्यांनी सांगितले की माझ्या हितचिंतकांना ,कार्यकर्त्यांना माझं एक सांगणं आहे की डॉक्टरांनी एक महिना सक्तीची विश्रांती सांगितल्यामुळे नाईलाजाने मला कुणालाही भेटता येणार नाही त्यामुळे मला कुणीही भेटायला येऊ नये ही माझी एक नम्र विनंती.एक महिन्याच्या विश्रांतीनंतर मी आपल्या सेवेत आणि सोबत कायम असेल. या सर्व कठीण काळात महाराष्ट्राचे आधारवड मा.शरद पवार साहेब ,जेष्ठ बंधूप्रमाणे माझी काळजी घेणारे मा.उद्धवजी ठाकरे ,मा.सुप्रियाताई सुळे ,मा.अनिल देशमुख ,मा.जयंत पाटील ,मा.राजेश टोपे ,मा.मिलिंद नार्वेकर आणि इतर अनेक लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले मला बळ दिले.

माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती.

महिन्याभरानंतर मी आपल्या सर्वांमध्ये आणि सर्वांसाठी पुन्हा असेल.
धन्यवाद 🙏💐

अपने कदमों के काबिलियत पर
विश्वास करता हूं ,
कितनी बार तूटा लेकीन
अपनो के लिये जीता हूं ,

चलता रहूंगा पथपर
चलने मैं माहीर बन जाऊंगा
या तो मंजिल मिल जायेगी
या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.