मेट्रो कार्यस्थळी हात धुण्याकरिता हँड फ्री सोय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

मेट्रो कार्यस्थळी हात धुण्याकरिता हँड फ्री सोय

• टाकाऊ साहित्या पासून तयार सयंत्र


नागपूर - संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि त्यामुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वत्र आणि सातत्याने वाढत असताना, याची गंभीर दखल महा मेट्रोने घेतली आहे. महा मेट्रोतर्फे या निमित्ताने देखील विविध उपाय योजना राबवल्या जात आहेत. मेट्रो स्टेशन तसेच इतरत्र या संबंधाने पाऊले उचलली जात आहेत.या रोगाच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्याकरिता तसेच याची लागण होऊ नये म्हणून आवश्यक असलेल्या बाबींसंबंधी माहिती दिली जाते आहे.

तसेच हात धुण्याकरिता पैडल ऑपरेटेड हँड फ्री हँड वॉश मशीन सिताबर्डी मेट्रो स्टेशन,कास्टिंग यार्ड,लेबर कॅप याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहे. सदर हँड फ्री हँड वॉश मशीनचा उपयोग हाताने न करता पायाने केल्या जात आहे. ज्यामध्ये एक पैडल दाबल्यास हँड वॉश येत असून दुसरे पैडल द्वारे पाणी देखील पाण्याच्याटाकी मधून बाहेर येत हात स्वच्छ धुतल्या जाऊ शकते. मुख्य म्हणजे सदर मशीनची निर्मिती करण्याकरिता साहित्य विकत घेतले नसून कार्य स्थळी उपलब्ध असलेल्या टाकाऊ अनावश्यक लोखंडी आणि इतर टाकाऊ साहित्या पासून हे सयंत्र तयार केले आहे. या व्यतिरिक्त महा मेट्रो द्वारे या आधी देखील मेट्रो स्टेशन,मेट्रो कोच तसेच कार्यस्थळी औषधाची फवारणी करण्यात आली आहे तसेच सूचना फलक आणि स्टेशन परिसरातील टीव्ही स्क्रिनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.   

स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येकाने कुठली काळजी घ्यायला हवी या संबंधीची माहिती मेट्रो कामगारांना देण्यात येत आहे. या रोगाची नेमकी लक्षणे काय आणि ती जाणवल्यास काय करायला हवे याची देखील माहिती याअंतर्गत दिली जाते आहे. महा मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना देखील या रोगाच्या निमिताने अधिक सतर्क केले आहे. एकीकडे या सारख्या उपाय योजना होत असताना, या रोगाची बाधा होऊ नये याकरिता सर्व सामान्य नागपूरकरांनी प्रयत्न करावे असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे.