पर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी नवीन चळवळ येणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

पर्यावरणचे संतुलन राखण्यासाठी नवीन चळवळ येणार

जुन्नर /आनंद कांबळे
युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या माध्यमातून पर्यावरण चे संतुलन राखण्यासाठी आंबेगाव तालुक्यात एक नवीन चळवळ सुरू करण्यात येत आहे,
"आमचं गाव ...वणवा मुक्त गाव" असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात यांनी सांगितले .


या अभियाना अंतर्गत युगप्रवर्तक प्रतिष्ठाण व वन विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने वणवा मुक्त गावांचा प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन पर्यावरण दिनाचे दिवशी सन्मान करण्यात येणार आहे या मागचा युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चा उद्देश हाच आहे की पर्यावरण राखण्यासाठी संस्थेचा खारीचा वाटा म्हणून हे अभियान या वर्षी पासून म्हणजे सन २०२०-२१ पासून सुरू करण्यात येत असून जास्ती जास्त गावांनी या उपक्रमात सहभागी व्हावे पर्यावरण राखण्यास मदत करावी
वास्तविक "वणवा" म्हणजे काय तर दैनंदिन स्वरूपात विविध ठिकाणी वनपरिक्षेत्र या मध्ये वणवा लावण्याच्या प्रकारामुळे जैविक साखळीला बाधा येते तर पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे या गोष्टीला आळा बसण्यासाठी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण च्या वतीने जनजागृती म्हणून वणवा मुक्त गाव,वणवा मुक्त जंगल सन्मान अभियान या वर्षी पासून सुरू केले आहे
डोंगराळ भागात वणवा हा नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागतो आणि या वनव्याची लागलेली आग ही अनियंत्रित असते आणि त्यालाच वणवा असे म्हणतात उन्हाळ्यात जाणीव पूर्वक वणवा लावण्याचे प्रकार घडतात या कडे सर्व नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
     सर्वसाधारण नैसर्गिक आग ही जोरदार वाऱ्याने झाडाच्या फांद्या एकमेकांना घासून ,तसेच विधुत तारा एकमेकांवर आढळून जो वणवा लागतो तो नैसर्गिक वणवा म्हणता येईल .
       पण काही लोक गंमत म्हणून आगपेटीच्या सहाय्याने, लायटरने, सिगारेट पेटवून गवतावर फरकाने किंवा गैरसमज म्हणून पावसाळ्यात चांगले गवत येते म्हणून जाणीव पूर्वक वणवा लावला जातो हे साधारण मार्च ,एप्रिल व मे महिन्यात वणवा लावण्याचे प्रमाण जास्त असते या वनव्या मुळे वृक्षांची हानी होते तर जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांचा जीव जातो व त्या मुळे वनसंपदा नष्ट होत चालली आहे .
       ग्लोबल वार्मिंग रोखण्यासाठी ,वनसंपदा अबाधीत राखणेसाठी प्रत्येक गावाने नागरिकांनी वणवा लागलेला रोखला पाहिजे प्रत्येक नागरिकाने वनसंपदेचे रक्षण केले पाहिजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलाला लागलेले वणवे रोखणे गरजेचे आहे या साठी या साठी युगप्रवर्तक प्रतिष्ठाण आंबेगाव तालुक्याच्या वतीने आंबेगाव तालुक्यात "आमचं गाव --वणवा मुक्त गाव" हे अभियान सुरू केले असून ज्या गावांनी नैसर्गिक किंवा अनैसर्गिक वणवा लागू न देता  जंगलाचे रक्षण केले आहे त्या गावांचा सन्मान वनविभाग व युगप्रवर्तक प्रतिष्ठाण} च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह करून सन्मान करण्यात येणार आहे 
       तरी प्रत्येक गावांनी या पर्यावरणाच्या कार्यात सहभागी होऊन  पर्यावरण राखावे वनसंपदा राखावी व सहकार्य करावे.,असे आवाहन गौतमराव खरात यांनी केले.