कामगारदिनी १२५ गरजू कुटुंबांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

कामगारदिनी १२५ गरजू कुटुंबांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते अन्नधान्य वाटप


नागपूर - १ में जागतिक कामगार दिनी मा.ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते १२५ कुटुंबांना अन्नधान्य वाटप १२५ गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करून १ में जागतिक कामगार दिन नागपूर येथे साजरा करण्यात आला.

एम.एस.इ. वर्कर्स फेडरेशनचे संयुक्त सचिव कॉ. पी.व्ही. नायडू यांचे नैतृत्वात नागपूर अर्बन सर्कल मधील पदाधिकारी झोन उपाध्यक्ष कॉ. श्रीरंग मुत्तेमवार (सहायक अभियंता), सर्कल प्रमुख कॉ. आर. के. कमलाकर, सर्कल सहसचिव कॉ. राजेश वैले, पंकज खोडे, विभागीय सचिव रोशन गुजर व सुजित पाठक, नीलेश गेटमे, स्वप्निल साखरे, सुनिल पदमगीरवार, आशीष इंगळे, शंभरकर, कामठे, वाकोडे, सूर्यवंशी, कोटांगळे, लथाड, राठोड, टेकाम, राहुल महंत, नालमवार, भैसारे, गणोरकर, गेडाम, मोहतुरे, गिरधर सर, डी. ब. पाली, आशा मॅडम, रेवतकर, अतकरी, विकास, तायवाडे, कौस्तुब कुलकर्णी, बंडू राऊत यांनी अन्नधान्य वितरणाचे आयोजन केले होते. 

नामदेव नगर, कळमना मार्केट रोड नागपूर येथील शाळा मैदानावर हा कार्यक्रम सायंकाळी पार पडला. कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून डॉ. नितिन राऊत, उर्जा मंत्री व पालक मंत्री (नागपूर जिल्हा), प्रभारी मुख्य अभियंता (नागपूर) श्री दिलीप दोडके, कार्यकारी अभियंता श्री राजेश घाटोळे, अति. कार्य. अभियंता श्री श्रंगारे, वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा, उपाध्यक्ष कॉ. सी. एम. मौर्य, संयुक्त सचिव कॉ. पी. व्ही. नायडू  आणि आयोजक पदाधिकार्यांचे हस्ते १२५ कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

कोरोना व्हायरसच्या भितीमुळे संपूर्ण संचारबंदी लागू असल्यामुळे असंघटित कामगार व कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशा वेळेस आपल्या श्रमिक वर्गाला दिलासा म्हणून ही अल्पशी मदत करण्यात आली. लॉकडाउन सुरू झाल्यापासून कॉ. पी. व्ही. नायडू यांच्या टीम तर्फे आतापर्यंत १००० कुटुंबाला अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.