चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

चंद्रपुरात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण


चंद्रपूर महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक
चंद्रपूर/प्रतिनिधी
आतापर्यंत ग्रीन झोनमध्ये असलेल्या चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव झाला असून, चंद्रपूर येथील कृष्णनगरातील 50 वर्षीय इसमाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


हा कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण कोरोना आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती असून प्रकृती स्थिर आहे. त्याला दमा व खोकल्याचा त्रास होता असे सांगण्यात येत असून सुरुवातीला न्युमोनियाचाही त्रास होत असल्याची लक्षणे आढळली. 

या रुग्णाचा पूर्व इतिहास काय आहे, तो प्रवास करून आलेला आहे की इतर काही याबाबत अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. त्याचा अहवाल नागपूरला पाठवला होता. त्याचा शनिवारी निकाल पॉझिटिव्ह आला आहे.
चंद्रपूरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
बंगाली कॅम्प परिसरातील क्रिष्णानगर सील
 गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ कोरोना निगेटिव्ह असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज शानिवारी सायंकाळी 8:30 वाजता एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर महानगरातील बंगाली कॅम्प परिसरात असणाऱ्या क्रिष्णा नगर भागाला पूर्णतः बंद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिक जबाबदारीने लॉक डाऊन पाळावे, असे आवाहन केले आहे. नागपूर विभागात नागपूर, भंडारा पाठोपाठ आता चंद्रपूरमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. विभागात वर्धा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण नाही.


जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी सायंकाळी साडेआठ वाजता 50 वर्षीय एक पुरुष कोरोना पॉझिटिव निघाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा परिसर सील केला आहे. परिसरात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी रात्रीच कडेकोट बंदोबस्त करण्यात आला.उद्यापासून महानगर परिसरात लॉक डाऊन आणखी कडक करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्पष्ट केले आहे.