जुन्नर शहरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

जुन्नर शहरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर शहर परीट सेवा संघाच्या वतीने जुन्नर शहरातील समाज बांधवांना मटकी, काळे वाल, राजमा, हुलगे तूर डाळ सोयाबीन आदी कडधान्ये तसेच साखर, चहा पावडर आदी वस्तूंच किटचे वाटप करण्यात आले.
जुन्नर तालुका उपाध्यक्ष दत्ता गवळी, संघाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब गवळी ,सचिव शरद नांगरे , सहसचिव वैभव ससाणे ,कार्याध्यक्ष नितीन ससाणे, उपाध्यक्ष विजय बोऱ्हाडे, प्रशांत गवळी, खजिनदार मुकेश जाधव, मार्गदर्शक किसन गवळी, बाळासाहेब वाकचौरे,सदस्य गणेश गवळी, राजु गवळी, आदींनी वाटपाचे नियोजन केले. सध्याचे असलेले करोनाचे संकट ध्यानात घेऊन सोशल डिस्टनस चे नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला. जुन्नर शहरातील बराचसा समाजबांधव लॉन्ड्री व्यवसायावर अवलंबून आहे. दीड महिन्यापासून दुकाने बंद असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून शहरातील एकूण सर्व 43 समाज बांधवांना कीटचे वाटप करण्यात आले. समाज बांधवानी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.