सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टरांनी केली आरोग्य तपासणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ मे २०२०

सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टरांनी केली आरोग्य तपासणी

निफन्द्रा (प्रतिनिधी)
सध्या कोरोना विषाणू ने थैमान घातले असून संचार बंदी व लॉक डाऊन करण्यात आले. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही म्हणून संचार बंदी व धारा 144 लागू करून जमाव बंदी करण्यात आली. लोकांचा जमाव होऊ नये व नागरिकांनी घरीच रहावे, रस्त्यावर बिना कामाने फिरू नये, प्रशासनास सहकार्य करावे या करीता पोलीस विभाग जीवाची पर्वा न करता रात्रं दिवस आपले कार्य तत्परतेने पार पाडीत आहेत. त्यामुळे सावली येथील डाक्टर असोसीएशन ने सामाजिक बांधिलकी जपत पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी दिनांक 02/05/2020 रोजी पोलीस स्टेशन सावली येथे सकाळी 8:00 वा ते 10:00 वा पर्यंत केली. यावेळी डॉ. आर. ए. शेंडे, डॉ. एन. वाय. गेडाम, डॉ. विजय शेंडे, डॉ तुषार मर्लावार, डॉ. मनोज गेडाम, डॉ. गोबाडे, डॉ राऊत यांचे कडून ब्लड प्रेशर,  शुगर, ऑक्सिजन ,  टेम्परेचर ,  वजन आश्या प्रकारच्या शारीरिक वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. तसेच जनजागृती करिता अधिकारी कर्मचारी वर्गाला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या स्तरावर कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.