सामाजिक भान राखत लग्न सोहळा पार पडला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ मे २०२०

सामाजिक भान राखत लग्न सोहळा पार पडला
नागपूर- करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लाकडाउनमुळे अनेक विवाहेच्छुकांचे विवाह लांबणीवर पडत असले, तरी नागपूर येथील एका जोडप्यांनी लॉकडाउनच्या काळातच साधेपणाने वधुच्या घरी मोजक्या २० पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. शुभांगी गोधे व कौस्तुभ आवळे असे या वधू-वराचे नाव आहे. दोघेही उच्चशिक्षित असून शुभांगी ह्या वैद्यकीय संशोधन सहाय्यक पदावर कार्यरत असून कौस्तुभ आवळे हे पेशाने इंटेरियर डिझायनर असून अखिल भारतीय ग्राहक सरंक्षण समिती (महाराष्ट्र सचिव) आहे.१८ मे रोजी अजनी येथील वधूच्या घरी मोजक्या पाहुणे मंडळींच्या उपस्थित सर्व प्रकारचे नियम पाळून मंगलकार्य पार पडले. सर्वे आप्तेष्टांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.