अन्यथा कारवाईस तयार रहा; नवेगावबांध ग्रामपंचायत प्रशासनाचा दुकानदारांना इशारा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ मे २०२०

अन्यथा कारवाईस तयार रहा; नवेगावबांध ग्रामपंचायत प्रशासनाचा दुकानदारांना इशारारोगराईने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करावी - सरपंच अनिरुद्ध शहारेसंजीव बडोले/नवेगावबांध

दिनांक 1 मे 2020
नवेगावबांध:- कोरोणा व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे जागतिक महामारीचा धोका ओळखून, नवेगावबांध येथे सकाळी ८ते दुपारी २ वाजेपर्यंत गावातील किराणा दुकान, सब्जीभाजी विक्रेते,फळांचे दुकान सुरु ठेवण्याच्या संबधितांना सुचना दिलेल्या आहेत. त्याबरोबरच इलेक्ट्रिक,बांधकाम,साहीत्याचे दुकान,लोहा, सिमेंट,रेती,चष्मा ही दुकाने सकाळी ८ते २ वाजेपर्यंत केवळ सोमवार,बुधवार, शुक्रवार ला सुरु राहतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तरीपण काही दुकानदार वेळेचे बंधन न पाळता दिवसभर आपली दुकाने सुरू ठेवतात. अशांवर कारवाई करण्यात ग्रामपंचायत मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दुकानदारांना देऊन, रोगराईने धान पिकाचे 30% टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसात ग्रामपंचायत मध्ये नोंदणी करावी असे आवाहन सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी एका निवेदना द्वारे केले आहे.गावातील दुकानदारांना चौका-चौकात जाहीर सुचनाद्वारे कळविण्यात आले. ग्रामपंचायत परीसरात लाऊडस्पिकर द्वारे दवंडी देऊन कोरोणा व्हायरस पासुन बचाव करण्यासाठी ग्रामवाशियांनी लॉकडावूनचे पालन करावे. सोशल डिस्टेटींगचे पालन करावे. अन्यथा दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. अत्याआवश्यक कामासाठी घरा बाहेर निघतांना मास्क अथवा गमछाचा वापर करावा. कोणत्याही वस्तूला हात लावण्यापूर्वी, हात साबनाने स्वच्छ धुवावे. बाहेरुन गावात येणाऱ्या लोकांनी प्रथम घरी न जाता, ग्रामिण रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. स्वत:च्या कुटुंबाच्या व गावाच्या बचावासाठी १४ दिवस एका वेगळ्या रूम मध्ये विलगीकरण करावे. बाहेरून गावात जर कुणी आला तर त्याची त्वरीत माहिती ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन,तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता यांच्याकडे द्यावी. गावात काही लोक चौका-चौकात लॉकडावूनचे पालन न करता गर्दी करतात व पोलिस गाडी बघुन पळतात, ही गंभीर बाब आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून गावात कुणीही तणाव निर्माण करू नये. शांतता व सुव्यवस्था कायम ठेवावे. कायद्याचे उल्लंघन होणार नाही, असे कृत्य कुणीही करू नये,तसेच असे कृत्य करण्यास दुसऱ्याला चेतवु नये. संचारबंदीचे युद्ध पातळीवर पालन व्हावे. या करीता नवेगावबांध पोलिस आपले कर्तव्य व जबाबदारी चोखपणे बजावण्यास सज्ज आहेत. काही दुकानदार दुपारी २ वाजे नंतर सुध्दा अरेरावीने आपली दुकाने सुरू ठेवतात. हे राजरोस पणे लॉकडावूनचे उल्लंघन आहे. या प्रकरणी कुणावर पोलिसांकडुन कारवाई झाल्यास. त्यास ते स्वतः जबाबदार राहतील. याची नोंद घ्यावी. ग्रामवाशियांनी संचारबंदी चे पालन करुन ,पोलिसांना सहकार्य करावे हि विनंती.ज्या रोगामुळे धान पिकाचे किमान ३०% नुकसान झाले असेल. अशा शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसांत ग्रामपंचायतला अर्ज करावे. अर्जात गट नं,त.सा.क,आराजी,जमीन धारकाचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचे नाव व खाता क्रमांक, IFSC Code यांचा समावेश असावा. अर्ज रोजगार सेवक विलीन बडोले,पंकज जांभुळकर यांच्याकडे सादर करावे.असे आवाहन अनिरूध्द शहारे सरपंच नवेगावबांध यांनी केले आहे.