सावधान! खोटे मेसेज पसरविल्यास होणार कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

सावधान! खोटे मेसेज पसरविल्यास होणार कारवाईकारवाई करण्याचे पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देशचंद्रपूर, दि. 10 मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचललेली आहे. समाज माध्यमाद्वारे कोरोना संदर्भात तसेच इतरही खोटे मेसेज पसरविणाऱ्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी देशव्यापी लॉकडॉऊन केलेले आहे. या लॉकडॉऊन दरम्यान समाज माध्यमांद्वारे अनेक खोटे मेसेज तसेच जुने मेसेज, छायाचित्र पाठवून अफवा पसरल्या जात आहे. सर्वांना 15 हजार रुपये मिळणार आहे. यासाठी फॉर्म भरून हे पैसे प्राप्त करावे. अशा आशयाचा खोटा संदेश समाज माध्यमांद्वारे प्रसारित केल्या जात आहे. त्यामुळे असे कोणतेही पैसे मिळणार नसून हा संबंधित संदेश खोटा आहे.अशा खोट्या संदेशावर विश्वास ठेवू नये तसेच संदेशाची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारचे खोटे संदेश, अफवा व चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील दिला आहे.

खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी या अधिकृत समाज माध्यमांना फॉलो करा:

जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयाच्या District Corona Control Cell Dio Chandrapur या फेसबूक पेजला, chanda.nic.in या संकेतस्थळाला तसेच @InfoChandrapur या ट्विटर हॅन्डलला, www.diochanda1.blogspot.in या ब्लॉगला फॉलो करु शकता.

चंद्रपूर पोलीस विभागाच्या www.chandrapurpolice.gov.in या संकेतस्थळाला,        Chandrapur Police या फेसबुक पेजला तसेच @SPChandrapur या ट्विटर हॅन्डलला नागरिकांनी फोलो करा.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या www.zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या www.cmcchandrapur.com या संकेतस्थळाला तसेच chandrapur municipal corporation या फेसबुक पेजला फॉलो करावे.

डॉक्टरनर्सफार्मासिटिकल्सरुग्णवाहिकाआरोग्य विभागाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चंद्रपूर पोलीस विभागातर्फे 9404872100 हा संपर्क क्रमांक व व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.