कोलाम सहाय्यता अभियानांतर्गत १२०२ कुटुंबांना मदत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ मे २०२०

कोलाम सहाय्यता अभियानांतर्गत १२०२ कुटुंबांना मदत
■ कोलाम विकास फाउंडेशन, शेतकरी संघटना यांचा पुढकार
■ अनेक सेवाभावी संस्थांची मदत

कोरोना संकटकाळात मजूरी व रोंजंदारीचे काम बुडले, पुरेशी शासकीय मदत लोकांपर्यंत दिसत नाही. दुर्लक्षित कोलाम कुटुंबाला लॉकडाउन काळात मदतीचा हातभार लागावा म्हणून कोलाम विकास फाउंडेशनने आदिम कोलामांच्या मदतीसाठी 'कोलाम सहाय्यता अभियान सुरु केले आहे. मागील ६ टप्प्यात जिवती, कोरपणा, राजुरा तालुक्यातील १००२ कुटुंबांना मदत पोहचवल्यानंतर काल ७ व्या चरणात आणखी २०२ आदिम कुटुंबांना मदत पोहचविण्यात आली. कोलाम विकास फाउंडेशनला या अभियानात शेतकरी संघटना, डोनेटकार्ट, तनिष्का ग्रुप, पाथ फाउंडेशन आदींचे सहकार्य लाभले. यावेळी मूर्ती कोलाम गुडा, लाईनगुडा, बापू नगर, बेलपुर, घोडणकपी आदी गुड्यांवर सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मदतकार्य पोहचवण्यात आले. शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी आमदार अ‍ॅड. वामनराव, कोलाम विकास फाउंडेशनचे संस्थापक विकास कुंभारे, डोनेटकार्टचे .. बोबडे, मधुकर डांगे, बिंदु गजभिये, अ‍ॅड. दीपक चटप यांची पूर्णवेळ उपस्थिती होती.

यायाधी सहा टप्प्यात १००२ आदिम कोलाम कुटुंबांना तर सातव्या चरणात मूर्ती कोलामगुडा, लाईनगुडा, डोंगरगाव, कोलामगुडा (बापूनगर- सूबई), कोलामगुडा (थोमापुर), बेलगाव(नंदप्पा) घोडणकप्पी, कमलापुर (येरगव्हाण) या कोलामगुड्यातील २०० कुटुंबांना मदत पोहचवली आहे.कोरोना संकटकाळात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिवती, कोरपणा व राजुरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिम समुदाय आहेत.

समाजातील वंचित असलेल्या आदिम कुटुंबांचा रोजगार कोरोना मुळे ठप्प आहे. शहसकीय मदतीत तेल, तिकट, मीठ, हळद, बरबट्टी आदी जीवनावश्यक साहित्य न मिळाल्याने या अतिदुर्गम भागातील कोलाम कुटुंबांची परिस्थिती बेताची झाली आहे. या कठिण प्रसंगी लॉकडाऊन काळात पुरेल इतके उदरनिर्वाहाचे साहित्य या जीवनावश्यक किट्स मध्ये देण्यात आले आहे.

आज एकीकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक पॅकेजची घोषणा सरकार कडून होत असताना ही आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात आदिम कोलाम कुटुंबापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. परंतु, शासकीय मदत अपुरी असल्याने विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कोलाम सहाय्यता अभियान राबविण्यात येत असल्याचे मत कोलाम विकास फाउंडेशनचे विकास कुंभारे यांनी मांडले. तर,

"आमदार असताना अनेकांना राहण्यासाठी घरे मंजूर केली आणि महसूल विभागात बहुतांश कोलामांची नोंद करून घेतली. परंतु, आजही कोलाम समाजाच्या विकासासाठी गरजे इतका निधी शासनाकडून वितरित होत नाही. आता मजूरीचे काम बंद असल्याने उपजीवीकेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावेळी 'बूडत्याला काठीचा आधार' म्हणून ही मदत आम्ही पोहचवली. शासनाने या समाजाकडे लक्ष देत मोठ्या प्रमाणात मदत करावी अशी मागणी माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केली.
यापुढील काळात कोलाम सहाय्यता अभियानांतर्गत उर्वरित कोलाम कुटुंबांना मदत पोहचवण्यात येणार आहे.
---------------------------------------------