अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व रुग्णालयात सर्वच अद्यावत आरोग्यसेवा मिळाव्यात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मे २०२०

अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व रुग्णालयात सर्वच अद्यावत आरोग्यसेवा मिळाव्यात
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची मागणी


आता रेफर टू गोंदिया नको


संजीव बडोले/ नवेगाव बांध

दिनांक 30 मे 2020
नवेगावबांध:-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर आरोग्य व्यवस्था यांचा अत्याधुनिक यंत्रणा,इमारत, रिक्त पदे व ईतर कायापालट करण्याचा दृष्टीने आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर चे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांचेशी ग्रामीण रुग्णालय सडक-अर्जुनी येथे आज दिं 30 मे रोज शनिवारी चर्चा केली. यावेळी डॉ.मनोहर मुडेश्वर, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धुमनखेडे, रतिराम राणे, उद्धव मेहेंदळे, माधव तरोने, डॉ.सुगत चंद्रीकापुरे, सम्राट चंद्रीकापुरे शिवाजी गाहाने ईतर उपस्थित होते.
जनतेचे आरोग्य सुदृढ,निरोगी राहावेत. रुग्णालयातच योग्य चाचणी व्हावी, ऑक्सीजन मिळावे, एक्स रे सारखी सुविधा मिळावी. रेफेर टू गोंदिया हे व्हायला नको. यासाठी अद्यावत ईमारत सुध्दा हवी. संभाव्य रोगाचे धोके टाळण्यासाठी आरोग्य विभाग कडून प्रारूप तयार करण्याचा मानस आहे. बांधकाम विभाग कडून जागा व ईमारत यांचा नकाशा मागविला असल्याचे यावेळी आमदार म्हणालेत. शासनाकडून योग्य निधी उपलब्ध करून घेऊ . यासाठी आपण मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, आरोग्य मंत्री डॉ. टोपे, तसेच खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे सहकार्य घेणार असल्याचे यावेळी आमदार चंद्रिकापुरे म्हणालेत.
अर्जुनी मोरगाव विधानसभा भक्षेत्राचा विकास करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, कृषी, रोजगार पर्यटन इतर बाबीवर आपला भर असल्याचे यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे पुढे म्हणाले.