बरांज तांडा येथील हातभट्टीवर पोलिसांची कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मे २०२०

बरांज तांडा येथील हातभट्टीवर पोलिसांची कारवाई

  • चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त
  • चार आरोपी अटकेत

भद्रावती(प्रतिनिधी)

तालुक्यातील बरांज तांडा येथील हातभट्टीच्या दोन वेगळ्या कारवाईत चार आरोपीला अटक करण्यात आली असून दारूसह चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई मंगळवार ला करण्यात आली

यातील पहिल्या कारवाईत देविदास रामजी चौधरी ,सुरज राजू लावडीया, राहणार बरांज तांडा तर दुसऱ्या कारवाईत सुरज पारखी ,अक्षय निखाडे राहणार वरोरा. अशी आरोपींची नावे आहे गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख अमोल तुळजेवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बरांजतांडा येथील झुडपी जंगलात गुळाची दारू काढीत असताना पोलिसांनी दोन आरोपी सह येथील मुद्देमाल जप्त केला तर दुसऱ्या कारवाईत मानोरा फाट्याजवळ बरांज तांडा येथील दारू दुचाकी वाहनाने नेत असताना दोन आरोपींना अटक करण्यात आली त्यांचेकडून 450000 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी अमोल तुळजेवार सचिन गुरनुले . हेमराज प्रधान .केशव चिटगिरे ,शशांक बद्दमवार यांनी ही कारवाई केली .