फेक खबर! त्या पोर्टलवर होणार कडक कारवाई - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ मे २०२०

फेक खबर! त्या पोर्टलवर होणार कडक कारवाई


जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले निर्देश

चंद्रपूर, दि.7 मे: कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडिया) चुकीचे संदेश अथवा अफवा पसरविल्या जात आहे. अशा अफवा पसरविणाऱ्या नागरिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. यासंदर्भात काही वादग्रस्त पोर्टल व चुकीच्या बातम्या वाारंवार देणाऱ्या संकेतस्थळावर सायबर विभागाने लक्ष वेधावे व दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी असे स्पष्ट केले आहे.


कोरोना विषाणूच्या संदर्भात वेबपोर्टलवर अनधिकृतपणे बातम्या प्रसारित करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडिया) 2 दिवसांपूर्वी एका अज्ञात वेबपोर्टलकडून जिल्ह्यात 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असे वृत्त प्रसारित करण्यात येत होते. त्याहीपूर्वी एका रुग्णाचा अहवाल फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटरवर अपलोड करण्यात आला. असे अनेक चुकीच्या बातम्या पोर्टलवरही झळकत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तसेच शासनाची प्रतिमा मलीन करण्याचा उद्देश या बातम्यातून दिसून येतो. अशा पोर्टलचा तपास करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

माणिकगड (गडचांदूर) येथून ताब्यात घेतलेल्या 3 नागरिकांची नांदेड प्रशासनाकडून पुढील पडताळणी होणार आहे. खबरदारी म्हणून नांदेड येथील पथक  सह चंद्रपूर येथे येऊन ताब्यात घेतलेल्या तीनही नागरिकांना तपासणी व पडताळणीसाठी नांदेड येथे रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत मिळाली आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवु नये. जनतेमध्ये भीती निर्माण होईल असे संदेश किंवा माहिती विशेषतः कोरोना आजारा संदर्भातील सर्व वृत्त जिल्हा प्रशासनाकडून दिल्याशिवाय माध्यमांनी देऊ नये तसेच सोशल मीडियावर प्रसारित करू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.व्हाट्सअँपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडिओज, पोस्ट्स पाठवून व महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्यास अॅडमीनसह अशा सर्वांवर शासनाच्या प्रचलित विविध कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.


कोरोना विषाणू संदर्भात समाज माध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या अफवांना बळी न पडता व अनधिकृत चुकीच्या माहितीवर अंकुश ठेवण्यासाठी नागरिकांना अधिकृत व खात्रीशीर माहिती तात्काळ व अद्ययावत मिळण्यासाठी, महाराष्ट्र शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि महाराष्ट्र या शीर्षकाचे https://www.mahainfocorona.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेचजिल्हा प्रशासनाच्या अधिकृत समाज माध्यमांना फॉलो करावे.ही असणार अधिकृत समाज माध्यमे:
जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती कार्यालयाच्या District Corona Control Cell व Dio Chandrapur या फेसबूक पेजला, chanda.nic.in 
या संकेतस्थळाला तसेच 
@InfoChandrapur 
या ट्विटर हॅन्डलला, 
या ब्लॉगला फॉलो करु शकता.
चंद्रपूर पोलीस विभागाच्या 
या संकेतस्थळाला,        
Chandrapur Police 
या फेसबुक पेजला तसेच 
@SPChandrapur 
या ट्विटर हॅन्डलला नागरिकांनी फोलो करा.

जिल्हा परिषद चंद्रपूरच्या 
या संकेतस्थळाला तसेच 
चंद्रपूर महानगरपालिकेच्या 
या संकेतस्थळाला तसेच chandrapur municipal corporation या फेसबुक पेजला फॉलो करावे.


डॉक्टरनर्सफार्मासिटिकल्सरुग्णवाहिकाआरोग्य विभागाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरविणाऱ्यांना कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास चंद्रपूर पोलीस विभागातर्फे 9404872100 हा संपर्क क्रमांक व व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा.असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.