आदर्श शिक्षक समितीकडून कोरोना यौद्ध्यांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

आदर्श शिक्षक समितीकडून कोरोना यौद्ध्यांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप
प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : आदर्श शिक्षक समिती नाशिक तसेच तालुका शाखा सिन्नर यांच्या माध्यमातून कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र दोडी,कोरोना चेकपोस्ट नांदूर शिंगोटे,वावी पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र वावी,आणि कोरोना चेकपोस्ट पाथरे याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी, पोलिस मित्र , शिक्षक यांच्या आरोग्याची सुरक्षितता राखावी म्हणून सॅनिटायजर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी सर्व आरोग्य,पोलीस ,शिक्षक कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामदास सांगळे , महिला आघाडी राज्य प्रमुख मुक्ता पवार , राज्य सहसचिव उत्तम पवार , शिक्षक समिती राज्याध्यक्ष विभागीय उपाध्यक्ष बाळासाहेब सानप , जिल्हा नेते प्रविण पाटील शांताराम सांगळे ,जिल्हाध्यक्ष राजू सानप ,तालुकाध्यक्ष संजय आव्हाड ,परशराम उगले ,साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन रामदास घुगे,जिल्हा चिटणीस मारुती आंधळे ,तालुका सरचिटणीस रवींद्र सातव, कोषाध्यक्ष सोमनाथ पथवे,प्रसिद्धी प्रमुख संदीप लेंडे,ज्ञानेश्वर केदार,अरुण आव्हाड, महेश पाबळे, गजानन ठोंबरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.