बंदीतही त्याने ढोसली दारू; ऑटो दुभाजकाला धडकून चालक जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मे २०२०

बंदीतही त्याने ढोसली दारू; ऑटो दुभाजकाला धडकून चालक जखमी
ऑटो चालक गंभीर जखमी

नवनीत नगर बसस्थानकाजवळ झाला अपघात

नागपूर : अरूण कराळे
तालुक्यातील वाडी नगर परिषद अंतर्गत असलेल्या नवनीत नगर बसस्थानक जवळ मद्यधुंद अवस्थेत ऑटो रिक्शा चालवित असलेल्या वाहन चालकाचे संतुलन बिघडल्यामुळे दुभाजकाला जोरदार धडक बसली . ही घटना मंगळवार ६ मे रोजी दुपारी २. ३० वाजताच्या दरम्यान घडली . ऑटो चालक अमोल अवित तायडे वय ४० वर्ष रा . रामजी नगर दवलामेटी असून सीआर एमएच ४९ ई ४००५ क्रमांकाचा ऑटो असून ऑटोचा समोरील भाग दबल्या गेला . ऑटोत कोणतेही प्रवाशी नसल्यामुळे जीवीत हानी झाली नाही. ऑटो दुभाजकाला धडकताच ऑटो चालक रक्तबंबाळ झाला होता . परिसरातील नागरिकांनी ऑटो चालकाला बाहेर काढले. वाडी पोलिसांना घटनेची माहीती मिळताच एनपीसी राहुल गवई, आशिष लोणेकरे घटनास्थळी दाखल झाले.
लगेच रुग्णवाहिका बोलावून चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील चौकशी वाडी पोलीस करीत आहे . वाडीत कुठेही देशी किवां विदेशी दारू मिळत नसतांना ऑटो चालकाला दारू कुठून मिळाली, हाच गंभीर विषय समोर आला आहे .