चेकपोस्ट वर ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कापडी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मे २०२०

चेकपोस्ट वर ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कापडी मास्क व सॅनिटायझर उपलब्धजुन्नर /आनंद कांबळे
रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी व रोटरी क्लब ऑफ पुणे निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील कोरोना सर्व्हे करणाऱ्या सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांना तसेच चेकपोस्ट वर ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कापडी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. दैनंदिन कोरोना सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांचा व चेकपोस्ट ला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सातत्याने लोकांशी संपर्क येत असतो. या कर्मचाऱ्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ पुणे निगडी व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी च्या माध्यमातून जुन्नर पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्या साह्याने हाती घेण्यात आल्याचे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष धनंजय राजुरकर यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी हा उपक्रम अतिशय उपयोगी असल्याचे गटशिक्षणाधिकारी पी एस मेमाणे यांनी सांगितले. या प्रोजेक्ट साठी रोटरी क्लब ऑफ पुणे निगडी चे अध्यक्ष रोटेरिअन विजय काळभोर यांनी सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून देण्यास मोलाची मदत केली.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी चे अध्यक्ष धनंजय राजुरकर, उपाध्यक्ष पवन गाडेकर, सचिव संतोष काजळे, खजिनदार सचिन ताथेड ,रोटेरिअन चेतन शहा,रोटेरिअन तुषार लाहोरकर,, रोटेरिअन, रूपेश शहा, रोटेरिअन सुनिल जाधव, रोटेरिअन हितेंद्र गांधी जुन्नरचे गटशिक्षणाधिकारी मेमाणे आदी मान्यवर उपस्थित होते.