विंचुरला आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मे २०२०

विंचुरला आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..!
विंचुर प्रतिनिधी/ दिपक घायळ
विंचुर ,ता.०१​ ​ येथील पोलीस कर्मचारी (वय ४८) यांची मालेगाव येथे बंदोबस्तासाठी नियुक्ती करण्यांत आली होती. त्यांना ताप येत असल्याने त्यांचे मालेगाव येथे ता.२८ एप्रिल रोजी स्वॅब घेण्यात आले होते. परंतु विंचुर येथील निवास्थानी आले होते. त्यानंतर ता.२९ रोजी त्यांना पुनःश्य त्रास होऊ लागल्याने ते विंचुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांनी प्राथमिक उपचार करुन येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असता येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. जाधव यांना कोरोना आजाराचे लक्षणे जाणवल्याने सदर रुग्णास नाशिक येथे शासकीय रुग्णालयात पाठवले. तेथे जुजबी उपचार करुन रुग्णास त्याच दिवशी परत पाठविण्यात आले.त्यानंतर ता.०१ रोजी रुग्णास जास्त त्रास होवु लागल्याने ते पुन्हा येथील शासकीय रुग्णालयात आले असता डॉ.जाधव यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णाने मालेगाव येथे बंदोबस्तास असल्याची व तेथे स्वॅब नमुना घेतला असल्याची माहिती दिली.त्यानंतर डॉ.जाधव यांनी त्यांच्या वरीष्ठांशी संपर्क साधुन सदर रुग्णाच्या तपासणी अवहाला संदर्भात विचार पुस केली असता सदर अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निषप्न झाले.त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एन के चव्हाण ,डॉ.साहेबराव गावले,डॉ.पी.आर.जाधव आदी वैद्यकीय पथक घेवुन रुग्णाच्या घरी जावुन रुग्णास व त्याचे कुटुंबातील रुग्णाची पत्नी,दोन मुले, दोन मजुर अशा एकुण सहा जणांना येवला येथील बाबुळगावच्या कोव्हिड १९च्या केंद्रात उपच्यार्थ दाखल करण्यात आले तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना येथील कर्मवीर विद्यालयात कोरोनटाइन करण्यात आले. ता.२ रोजी १७६३ घरातील १०६०० लोकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली. तसेच अजुबाजुचा परीसर बंद करुन औषधाची फवारणी करण्यात आली.